नवी मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न फळ बाजारात नोव्हेंबर २०२२ मध्ये मोठी आगीची घटना घडली होती. यावेळी गाळ्यांचे प्रचंड नुकसान झाले होते. त्यामुळे सुरक्षात्मक उपाययोजनेच्या अनुषंगाने एपीएमसी प्रशासनाने समिती गठीत करून अग्निविषयक अहवाल तयार केला आहे. हा अहवाल संचालक मंडळ बैठकीच्या प्रतिक्षेत होता. अखेर आगामी संचालक मंडळाच्या बैठकीत मंजुरीसाठी पटलावर घेण्यात येणार आहे , अशी माहिती एपीएमसी प्रशासनाने दिली आहे. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती ही आशिया खंडातील सर्वात मोठी बाजारपेठ आहे. त्यामुळे या बाजारपेठेची व्याप्ती जरी मोठी असली तरी याठिकाणी पुरविण्यात येणाऱ्या सुरक्षित उपाययोजना तोकड्या पडत आहेत.
त्यामुळे बाजारात अग्निशमन यंत्रणाविना वारंवार आगीच्या घटना तसेच चोरीच्या घटनादेखील घडत असतात. बाजारात सक्षम अग्निसुरक्षा नाहीच शिवाय पुरेशी सीसीटीव्ही यंत्रणा ही नाही. मोठ्या प्रमाणावर अनधिकृत बांधकाम करून तसेच वाढीव जागेचा वापर करून अतिक्रमण केले आहे . त्यामुळे बाजारात रहदारीसाठी सुटसुटीत जागा कमी असल्याचे निदर्शनास येते. त्याच बरोबर बाजारात मोठ्या प्रमाणावर गाड्यांची वर्दळ असते. मागील वर्षभरात एपीएमसी बाजारात दोन ते तीन ठिकाणी आगीच्या घटना घडल्या आहेत.
हेही वाचा : खारघर वसाहतीमधील काही भागात पाणी समस्येने रहिवाशी हैराण
फळ बाजारात १७ नोव्हेंबर २०२२ मध्ये घडलेल्या घटनेत मोठ्या प्रमाणात गाळ्यांचे नुकसान झाले होते. तेच मागील महिन्यात मसाला बाजारात घडलेल्या आगीच्या घटनेत सुक्या मेव्याचे नुकसान झाले होते. मात्र याठिकाणी तोकडी जागा आणि अग्नि सुरक्षा नसल्याने आग विझविण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करावे लागले होते. फळ बाजारात मोठ्या प्रमाणावर लाकडी पेट्या, पुठ्ठे, गवत यांचा समावेश असतो. फळ बाजारात मोठा अग्नि तांडव पाहायला मिळाला होता. ही आग पुठ्ठे आणि अतिक्रमणामुळे अधिक दूरवर पसरली होती. त्यामुळे या घटनेचा पाहणी दौरा करून एपीएमसी बाजार प्रशासनाने पाच बाजारातील अधिकाऱ्यांसमवेत समिती गठीत करून एपीएमसीतील अग्निसुरक्षासह इतर सुरक्षिततेच्या बाबतीत अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या होत्या.
हेही वाचा : मोरा – मुंबई जलप्रवासासाठी प्रवाशांना पार करावी लागते अडथळ्यांची शर्यत
पाचही बाजारातील उपसचिव यांच्याकडून पाहणी दौऱ्यातून केलेली टिप्पणी अहवाल नमूद करण्यात आलेली आहे. मात्र हा अहवाल गेल्या तीन ते चार महिन्यांपासून मंजुरीविना धूळखात पडून आहे. संचालक मंडळाच्या बैठका होत नसलेल्या अहवाल मंजुरीसाठी विलंब होत असल्याचे कारण एपीएमसी प्रशासनाकडून पुढे केले जात होते. अखेर ८ महिन्यांनी संचालक मंडळाची बैठक झाली असून आता आगामी बैठकीत एपीएमसी अग्नी विषयक अहवाल मंजुरीसाठी पाठविला जाणार आहे. ‘एपीएमसीतील आगीच्या घटनेनंतर समिती गठीत करून अहवाल तयार करण्यात आलेला आहे. संचालक मंडळाची बैठक होत नव्हती. त्यामुळे मंजुरी प्रक्रियेत आहे. येत्या संचालक मंडळाच्या बैठकीत मंजुरीकरिता पाठविण्यात येणार आहे’, एपीएमसीचे कार्यकरी अभियंता सुरेश मोहाडे यांनी म्हटले आहे.