नवी मुंबई – आज रविवारी सकाळी ११.१५ ते सायंकाळी ४.१५ पर्यंत मानखुर्द ते नेरूळ स्थानकादरम्यानची लोकल सेवा बंद राहणार आहे प्रवाशांच्या सोयीसाठी सीएसएमटी ते मानखुर्द दरम्यान विशेष लोकल चालवण्यात येणार आहे. तसेच हार्बर मार्गावरील प्रवासी रविवारी सकाळी १० ते दुपारी ४.३० वाजेपर्यंत ट्रान्स हार्बर आणि मुख्य मार्गीकेवरून प्रवास करू शकतील. हे मेंटेनन्स मेगा ब्लॉक्स पायाभूत सुविधांच्या देखभालीसाठी आणि सुरक्षिततेसाठी आवश्यक आहेत. प्रवाशांना होणार्या गैरसोयीबद्दल रेल्वे प्रशासन दिलगीर असून रेल्वे प्रवाशांनी सहकार्य करावे असे आवाहन मध्य रेल्वे तर्फे करण्यात आले आहे.
संग्रहित लेख, दिनांक 13th Aug 2023 रोजी प्रकाशित
मानखुर्द – नेरुळ अप आणि डाउन हार्बर मार्गावर सकाळी ११.१५ ते सायंकाळी ४.१५ पर्यंत मेगाब्लॉक
प्रवाशांना होणार्या गैरसोयीबद्दल रेल्वे प्रशासन दिलगीर असून रेल्वे प्रवाशांनी सहकार्य करावे असे आवाहन मध्य रेल्वे तर्फे करण्यात आले आहे.
Written by लोकसत्ता टीम

First published on: 13-08-2023 at 11:10 IST
Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mumbai local mega block mega block on harbour line mega block on sunday zws