मुंबई-पुणे महामार्गावर अपघातात १७ ठार , पाच वर्षांत अडीच हजार दुर्घटनांत ६०० हून अधिक बळी
मुंबई-पुणे या दोन महानगरांना जोडणारा द्रुतगती मार्ग दिवसेंदिवस मृत्यूसापळ्यांचा मार्ग बनत चालला असून रविवारी पहाटे या मार्गावर पनवेलनजीक झालेल्या भीषण अपघातात १७ जण ठार तर ४७ प्रवासी जखमी झाले. गेल्या पाच वर्षांत या मार्गावरील अडीच हजार अपघातांनी ६०० हून अधिक जणांचे बळी घेतले आहेत. विशेष म्हणजे द्रुतगती मार्गावरील सहा अपघातप्रवण ठिकाणांवर उपाययोजना करण्याबाबत महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडे पाच वेळा स्मरणपत्रे देऊनही त्याकडे संबंधितांनी डोळेझाकच केल्याचे स्पष्ट झाले आहे.
द्रुतगती मार्गावर पनवेलनजीक शेडुंग गावाजवळ एक खासगी प्रवासी बस स्विफ्ट व इनोव्हा या दोन गाडय़ांवर आदळून रस्त्यालगतच्या खोल खड्डय़ात कोसळली. या भीषण अपघातात १७ जण ठार तर ४७ जण जखमी झाले. जखमींना तातडीने महात्मा गांधी मिशन (एमजीएम) रुग्णालयात दाखल करण्यात आले. मृतांमध्ये महर्षी दयानंद महाविद्यालयातील भौतिकशास्त्राचे प्राध्यापक अविनाश कारंडे (३९) यांचा समावेश आहे. या अपघाताच्या पाश्र्वभूमीवर द्रुतगती मार्गावरील वाहतूक सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. या मार्गावरील सर्वाधिक अपघात पुण्यातून मुंबईला येताना होतात. त्यात मार्गावर उभ्या असलेल्या वाहनांना धडक दिल्याने, भरधाव अवजड वाहनांच्या धडकेमुळे आणि वाहनांवरील चालकाचा ताबा सुटल्याने होणाऱ्या अपघातांची संख्या अधिक आहे.
अपघाताचे वृत्त समजताच सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे यांनी एमजीएम रुग्णालयात धाव घेऊन जखमींची विचारपूस केली. जखमींवर सरकारतर्फे मोफत उपचार केले जातील, असे आश्वासनही त्यांनी दिले.

बसचालक मद्यपी?
निखिल ट्रॅव्हल्सचे बसचालक इकबाल शेख याचे शवविच्छेदन करते वेळी शेख हा मद्यपी असल्याची शंका डॉक्टरांना आली. शेख याचा व्हिसेरा मुंबईतील न्यायवैद्यक प्रयोगशाळेत पाठवण्यात आला आहे.
बचावकार्याला सुरुवात
अपघाताची भीषणता लक्षात येताच इनोव्हा चालक आशिष पाटील व त्यांच्या मित्रांनी अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी धाव घेतली. द्रुतगती मार्गावरून जात असलेल्या टेम्पोचालकाने मदत केली. त्याने द्रुतगती मार्गावर अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी तत्पर असलेल्या पथकाशी संपर्क साधून घटनेची माहिती
दिली. तसेच स्वत: खड्डय़ात उतरून अनेक जखमींना बाहेर काढण्यास आशिष व त्यांच्या मित्रांना मदत केली.

patient dies due to negligence culpable homicide case registered against doctor
हलर्गजीपणामुळे रुग्णाचा मृत्यू; डॉक्टर विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
1.5 thousand people committed suicide in Vasai Bhayander in 5 years
५ वर्षात वसई, भाईंदर मध्ये दिड हजार जणांच्या आत्महत्या;२०२४ मध्ये गळाफास घेऊन सर्वाधिक आत्महत्या
Taloja MIDC road accident
भरधाव मोटार उलटून तरुणीचा मृत्यू; मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावर अपघात; सात जण जखमी
buldhana couple murder loksatta news
बुलढाणा : नातेवाईकांच्या भेटी घेतल्या, पण निरोप घेतला तो कायमचा; वृद्ध दाम्पत्याचा…
chole bhature Two youth found dead in noida room
Death by chhole: ‘छोले’ बनविणं जीवावर बेतलं, गॅसवर पातेलं ठेवून दोन तरुण झोपी गेले; सकाळी झाला मृत्यू
Tirupati stampede
Tirupati stampede : तिरुपती बालाजी मंदिरात चेंगराचेंगरी, सहा भाविकांचा मृत्यू
Terrifying Video hospital employess were seen dragging dead body
मृत्यूनंतरही यातना संपेनात! कर्मचाऱ्यांनी जनावराप्रमाणे मृतदेह नेला ओढत अन्…, माणुसकीला लाजवेल असा VIDEO

मृतांची नावे
वैजयंती मनोहर गुजर , (वय ३५) संघर्षनगर, ठाणे , पद्मा महेशकुमार बलदवा – (३५) सातारा, विलास बाबुराव माने , -(६२) नेरूळ , चंद्रभागा बाळकृष्ण चव्हाण (५०) तळे, तालुका कोरेगाव, संदीप यशवंत शिवणकर,( ३९) मेढा, काशिनाथ सखाराम निकम ( ४५), सातारा, प्रिया कल्याण कदम ( २३) – सातारा, सोनवडी चतुरा शिवाजी कदम ( ५५) – मीरारोड,
संदीप विठ्ठल चव्हाण (५५) – ठाणे, अनन्या कल्याण कदम (४ महिने) , सातारा
श्रद्धा दत्तात्रेय काळे ( २०) – आकुर्ली रोड, कांदिवली,
वेदिका नीलेश यादव (वय अडीच वर्षे) – भायखळा अविनाश हनुमंत कारंडे ( ३९) भांडुप
इकबाल बाबूलाल शेख (बसचा चालक – वय ६६) – विघ्नहर्ता कॉलनी, कोंडवे तीन महिलांची अद्याप ओळख पटलेली नाही.
महामार्गावर अपघात होणारी ठिकाणे अनेकदा सारखीच असल्याचे वाहतूक विभागाच्या अहवालातून स्पष्ट झाले आहे. अपघात रोखण्यासाठी उपाययोजना करण्यासंबंधीचा अहवाल विभागाने महाराष्ट्र राज्य रस्ते महामंडळाला दिला होता. मात्र, हा अहवाल संबंधितांनी गांभीर्याने न घेतल्याने उपाययोजनांच्या अंमलबजावणीला गती मिळत नसल्याचे मत काही पोलीस अधिकाऱ्यांनी अपघातानंतर व्यक्त केले.

अपघात असा झाला
* कांदिवली येथे राहणारे अमरजितसिंग शनिदर्शनावरून कुटुंबियांसह घरी परतत असताना त्यांची स्विफ्ट टायर फुटल्याने बंद पडली.
* द्रुतगती मार्गाच्या पहिल्या मार्गिकेवरच त्यांची गाडी बंद पडल्याने पुण्याहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या गाडय़ांना तिचा अडसर ठरत होता.
* घणसोली येथे राहणारे आशिष पाटील व त्यांचे काही मित्र इनोव्हा कारने घरी परतत असताना त्यांनी अमरजित यांच्या मदतीसाठी गाडी द्रुतगती मार्गाच्या डाव्या बाजूला थांबवली.
* अमरजित यांना टायर बदलण्यासाठी त्यांनी साहित्यही दिले. या दरम्यानच्या काळात अमरजित यांचे कुटुंब व इनोव्हातील चौघे जण रस्ता दुभाजकानजीक उभे होते.
* एकीकडे हे मदतकार्य सुरू असताना वेगाने येत असलेल्या निखिल ट्रॅव्हल्सच्या प्रवासी बसने प्रथमत स्विफ्ट गाडीला जोरदार

धडक दिली.
* त्यानंतर बसने रस्त्याच्या डाव्या बाजूला उभ्या असलेल्या इनोव्हा कारला धडक दिली आणि बाजूच्या खड्डय़ात कोसळली.
अपघातप्रवण ठिकाणे
* मुंबईला येताना खंडाळा येथील एस आकाराचे वळण
* अमृतांजन पूल उतरताना व चढताना नसलेली संरक्षित भिंत
* खोपोलीत राष्ट्रीय महामार्ग जोडताना एचओसीत नागमोडी वळण
* आडोशी बोगद्यात शिरण्यापूर्वीचे अपघातप्रवण क्षेत्र
* महामार्ग समाप्तीपूर्वी ३९ किलोमीटरवरील उतार
* सीआरआयएल कंपनीजवळील धोकादायक वळण

कच्चे दुवे
* रात्री वाहनांवर कारवाई करण्यासाठी यंत्रणा नाही
* कळंबोलीपर्यंत ई-चलन पद्धतीने कारवाई केली जाते मात्र द्रुतगती महामार्गावर वेगवान वाहनांना चाप बसण्यासाठी ती केली जात नाही
* कारवाईतही दंड २०० रुपये व ई-चलनाचा खर्च ७० रुपये असतो , त्यामुळे वेगाशी स्पर्धा लावणारे २०० रुपये दंड भरायला तयार असतात
* मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर बस-इनोव्हा-स्विफ्ट अपघातात परळ येथील महर्षी दयानंद महाविद्यालयातील प्राध्यापक डॉ. अविनाश कारंडे (३९) यांचाही मृत्यू झाला. अविनाश हे पत्नी मीनल कारंडे व आरुषी आणि वैदेही या दोन मुलींसह सातारा येथून परतत होते.

Story img Loader