नवी मुंबई: मोरबे धरणाच्या उभारणीसाठी सुरुवातीला गुंतवलेले १०८ कोटी रुपये परत करा अथवा ९० दशलक्ष लिटर अतिरिक्त पाणी तरी असा धोशा लावणाऱ्या सिडको प्रशासनाला या मुद्याावर अजिबात दाद द्याायची नाही असा निर्णय महापालिका प्रशासनाच्या स्तरावर घेण्यात आला आहे. मोरबे धरण नवी मुंबई महापालिकेच्या मालकीचे असून सिडकोला अतिरिक्त पाणी देता येणार नाही आणि पैसेही देणे शक्य नाही, अशी स्पष्ट भूमिका महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांनी लोकसत्ताशी बोलताना मांडली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मोरबे धरणाची निर्मिती करताना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाला सिडकोने १०८ कोटी रुपये दिले होते. हे पैसे अजूनही सिडकोला शासनाकडून मिळालेले नाहीत. नवी मुंबई महापालिकेने ५५३ कोटी ८९ लाख रुपयांचा भरणा जीवन प्राधिकरणाकडे केला आणि धरण विकत घेतले. पुढे जलवाहिन्या, कंत्राटदारामार्फत करण्यात येणाºया कामांवर बराच खर्च केला.

हेही वाचा… ब्रॅण्डेड खाद्य तेल घेताय सावधान! बाजारात पाम तेलामध्ये हव्या त्या तेलाचा इसेन्स टाकून तेल विक्री जोमात!

तरीही आम्ही दिलेल्या १०८ कोटींच्या मोबदल्यात महापालिकेने मोरबेतील ९० एमएलडी पाणी सिडकोला द्यावे अशी मागणी सिडको प्रशासनाने लावून धरली आहे. सिडको उपनगरांमधील वसाहतींमध्ये पाण्याचे दुर्भिक्ष लक्षात घेता हा आग्रह वाढू लागला आहे. या पाश्र्वभूमीवर पैसे आणि पाणी दोन्ही देता येणार नाही अशी भूमिका महापालिकेने घेतली आहे.

पाणी मागणी वाढणार

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ तसेच या शहराची झपाट्याने होऊ लागलेली वाढ पाहता नवी मुंबईची पाण्याची गरज वाढू लागली आहे. खारघर, कळंबोली, कामोठे, उलवे, करंजाडे अशा भागांचे नागरीकरणही वाढू लागले आहे. मोरबे धरणातील जवळजवळ ४० एमएलडी पाणी सिडकोच्या खारघर, कामोठे परिसराला महापालिकेमार्फत दिले जाते. सिडकोचे पंतप्रधान योजनेचे प्रकल्प नेरुळ, जुईनगर, वाशी परिसरांत उभे राहत असून तेथील पाण्याची मागणी आगामी काळात वाढणार आहे.

दरम्यान, नवी मुंबईतील भविष्याची पाण्याची वाढती गरज लक्षात घेता महापालिका नव्याने पाणी स्त्रोत उभारणीचे नियोजन करत आहे. त्यासाठी लागणारा निधी मोठा असल्याने सिडकोने दावा केलेला १०८ कोटी रुपयांचा निधी देणे शक्य नाही, अशी स्पष्ट भूमिका महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांनी लोकसत्ताशी बोलताना मांडली. यापूर्वीच सिडकोच्या उपनगरांना पाण्याचा पुरवठा केला जातो. त्यामुळे अतिरिक्त पाणीही देता येणार नाही, असेही ते म्हणाले.

मोरबे धरण वैशिष्ट्यपूर्ण माहिती

  • नवी मुंबई हद्दीपासून धरणाचे अंतर- ३१ किमी.
  • धरणाचा प्रकार- गुरुत्व
  • उगम- धावरी नदी
  • धरणाची उंची- ५३.४० मीटर
  • धरणाची लांबी- ३२५० मीटर
  • भूपृष्ठीय क्षेत्रफळ- ९७८ हेक्टर
  • मोरबेतून पाणी उपसा- ४७० एमएलडी

नवी मुंबईतील पाणीवितरण

  • मोरबे धरणातून उपसा – ४७० एमएलडी
  • खारघर कामोठे नोड – ४० एमएलडी
  • एमआयडीसीकडून पाणी मिळते – ८० ऐवजी ६० ते ६५ एमएलडी
Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Municipal commissioner rajesh narvekar said that morbe dam is owned by nmmc and cidco cannot be given extra water and money is also not possible dvr
Show comments