नवी मुंबई: नवी मुंबई शहरातील महापालिकेच्या शाळा इमारतींची मागील दोन दिवसांपासून न्यायाधीशांकडून पाहणी करण्यात येत आहे. पालिका शाळा इमारतींच्या भौतिक स्थितीचे अंतर्गत सर्वेक्षण केले जात आहे. धोकादायक व नादुरुस्त असलेल्या शाळांची पाहणी करून अहवाल तयार करीत असल्याची माहिती पालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नवी मुंबई महापालिकेच्या शाळांची स्थिती तसेच अगदी शौचालयापासून इतर सुविधांची पाहणी करण्यात येत आहे. त्यामुळे या न्यायाधीशांच्या समितीच्या पाहणी अहवालानुसार मुलांच्या सुरक्षिततेविषयी तसेच इतर सुविधाविषयी बदलाबाबत अहवाल देणार आहेत. शहरातील महापालिकेच्या शाळांची भौतिक स्थिती जाणून घेण्यासाठी न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. शाळांची पाहणी करून तो अहवाल दिला जाणार आहे. यासाठी शहरातील शाळांचे सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे. नवी मुंबई शहरात प्राथमिक माध्यमिक विभागाच्या तसेच मराठी, हिंदी, इंग्रजी, सीबीएसई अशा विविध माध्यमांच्या जवळजवळ ८० शाळा पालिकेत आहेत.

हेही वाचा… नवी मुंबईतील हाॅटेल मालकांची ठाणेवारी कारवाईपासून बचावासाठी मुख्यमंत्र्यांना साकडे?

दरवर्षी पालिकेच्या शिक्षण तसेच अभियंता विभागाकडून शाळांचे परीक्षण केले जाते. त्यामध्ये शाळा कोणत्या स्थितीत आहे, त्यात कोणती दुरुस्तीची कामे आवश्यक आहे याची पाहणी करून त्यात सुधारणा केल्या जातात. शाळांचा शैक्षणिक दर्जा उंचावला जात असताना न्यायालयाच्या आदेशानुसार शाळा इमारत समिती स्थापन करण्यात आली आहे. यात न्यायाधीश, पोलीस, जिल्हा सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता यांचा समावेश आहे. त्यांच्याकडून शहरात मागील काही दिवसापासून शाळांचे सर्वेक्षण सुरू केले आहे.

नवी मुंबईतील पालिकेच्या शाळांची भौतिक स्थिती न्यायाधीश , पोलीस इतर समिती सदस्यामार्फत घेतली जात आहे. शहरात पालिकेच्या जवळजवळ ८० शाळा असून त्यांची माहिती घेण्यात येत आहे. – सुलभा बारघरे,विस्तार अधिकारी

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Municipal school buildings in navi mumbai are being inspected by judges dvr