नवी मुंबई : तीन अपत्य असताना सरकारी सेवेत राहून, सरकारी कर्मचारी सेवेचा लाभ घेणाऱ्या, नवी मुंबई अग्नीशमन दलाच्या दोन कर्मचाऱ्यांना सेवेतून थेट बडतर्फ करण्यात आले आहे. महापालिकेत दोन अपत्यापेक्षा अधिक अपत्य असणारे आणखी काही कर्मचारी आहेत.  त्यांच्यावर कारवाई होणार कि नाही अशी भीती निर्माण झाली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नवी मुंबई महानगरपालिकेत तीन अपत्ये असतानाही वर्षांनुवर्ष अनेक अधिकारी व कर्मचारी पालिका सेवेत राहून सरकारी कर्मचारी सेवेचा लाभ घेत असल्याची तक्रार महापालिकेकडे आलेली होती. आवाज फाऊंडेशनने न्यायालयात या बाबतीत जनहित याचिका दाखल केली आहे. मात्र विद्यमान महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांनी १९ जानेवारी २०२३ रोजी अग्निशमक दलातील तीन अपत्ये असणार्‍या कर्मचार्‍यांना कारणे दाखवा नोटीस बजावली होती.

हेही वाचा >>> आमदार मंदा म्हात्रे यांची महिलांसह नाचत गाजत होळी

शासकीय सेवेत गट अ,ब,क,ड संवर्गात २८ मार्च २००५ च्या शासनाने जाहीर केलेल्या अधिसूचनेवर तिसरे अपत्ये असलेल्या कर्मचार्‍यांची चाचणी नमुंमपाकडून करण्यात आलेली नाही. तिसरे अपत्य असलेले सरासरी ४० कर्मचारी पालिकेत भ्रष्टाचारी मार्गाने सेवा करत असल्याचा आरोप  आवाज फाऊंडेशनच्या वतीने करण्यात आलेला आहे.

हेही वाचा >>> महालक्ष्मी सरस प्रदर्शन बुधवारपासून वाशीत

शासनाच्या नियमानुसार, २००५ नंतर तिसरे अपत्य असणाऱ्यांना सरकारी सेवेचा लाभ घेता येत नाही. त्यानुसार आलेल्या तक्रारीची खातरजमा करून दोन कर्मचाऱ्यांवर बडतर्फीची कारवाई करण्यात आलेली आहे.

-राजेश नार्वेकर, महापालिका आयुक्त

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Municipal service three children two employees dismissal action by municipal administration ysh