नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रातील अे विभाग बेलापूर कार्यालयांतर्गत प्लॉट नं. ५८ से. २३ दारावे गांव नवी मुंबई याठिकाणी महानगरपालिकेची कोणतीही पूर्व परवानगी न घेता अनधिकृतपणे काम करण्यात आलेले होते. त्यामुळे येथील बांधकामावर महापालिकेने तोडक कारवाई करण्यात आली आहे.

हेही वाचा- कडाक्याच्या थंडीने अंजीर उत्पादन घटले

सदर अनधिकृत बांधकामास अे विभाग बेलापूर कार्यालयामार्फत महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम १९६६ मधील कलम ५४ अन्वये नोटीस बजाविण्यात आलेली होती. संबधितांनी केलेले अनधिकृत बांधकाम स्वत:हून हटवणे आवश्यक होते. परंतु त्यांनी सदर अनधिकृत बांधकाम हटविले आहे. या अनधिकृत बांधकामावर ए विभाग बेलापूर कार्यालयामार्फत विभाग अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईसाठी ए विभाग बेलापूर कार्यालयामधील अधिकारी, कर्मचारी, १० मजूर, गॅस कटर, १ इलेक्ट्रीक हॅमर यांच्या मदतीने तोडक कारवाई करण्यात आल्याची माहिती विभाग अधिकारी मिताली संचेती यांनी लोकसत्ताला दिली. यावेळी अतिक्रमण विभागाकडील पोलीस व्यवस्था तैनात करण्यात आले होते.