पनवेल: खारघर परिसरातील बेलपाडा ते उत्सव चौक या रस्त्यावर रविवारी रात्री साडेआठ वाजता दोन दुचाकीवरुन जाणा-या चालकांमध्ये दुचाकी दामटवणे आणि हुलकावणी दिल्याने शुल्लक शाब्दिक वाद झाला. या वादाचे पर्यवसन नंतर मारहाणीत झाले. हेल्मेटने वारंवार डोक्यात प्रहार केल्याने जखमी अवस्थेमधील ४५ वर्षीय शिवकुमार शर्मा हे पोलीस ठाण्यात गेले. खारघर पोलीसांना त्यांनी सर्व आपबीती सांगीतली. पोलीसांनी सुद्धा तक्रार लिहून घेतली. तक्रार लिहीण्याच्या अखेरच्या क्षणी संबंधित शर्मा हे बेशुद्ध झाले. पोलीसांनीच शर्मा यांना तातडीने मेडीसीटी रुग्णालयात दाखल केले. मात्र रुग्णालयातील डॉक्टरांनी शर्मा यांचा मृत्यू झाल्याचे सांगीतले. २२ तास उलटले तरी नवी मुंबई पोलीस अद्याप या मारेक-यांना पकडू शकले नाहीत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

रविवारी रात्री साडेआठ वाजता उत्सव चौकाच्या जवळ दोन दुचाकीस्वारांचे वाहन पुढे दामटविणे आणि हुलकावणी दिल्याने भांडण झाले. या रस्त्यावरुन जाणा-या इतर वाहनचालकांनी भांडणामध्ये मध्यस्थी न केल्याने भांडणाचे स्वरुप मारहाणीत झाले. हेल्मेटने वारंवार शिवकुमार याच्या डोक्यात चारवेळा मारहाण केल्यामुळे शिवकुमार अत्यवस्थ झाला. खारघर पोलीस ठाण्यात या घटनेबाबत स्वता शिवकुमार हे दुचाकी चालवून गेले. तेथे त्यांनी रितसर २२ वर्षीय हिरव्या रंगाचा व २५ वर्षीय काळ्या रंगाच्या झब्बा घातलेल्या संशय़ीत मारेक-यांविरोधात हत्येचा गुन्हा नोंदविला. २२ ते २५ वयोगटातील हे मारेक-यांना पकडण्यासाठी पोलीसांची १५ वेगवेगळी पथक कार्यरत असल्याची माहिती खारघर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक दीपक सूर्वे यांनी दिली. 

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Murder in anger over being chased on a bike kharghar crime news amy