नवी मुंबई : शिरवणे गावातील मुख्य रस्त्यावर भर दुपारी एका युवकाची हत्या झाली आहे. हत्या अनेकांच्या समोर झाली असून हत्या केल्यावर आरोपी सर्वांच्या देखत पळून गेला. याबाबत नेरुळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत. 

गोविंद रामण्णा श्रीरंगकुरे (वय ३०)  असे यातील मयत युवकाचे नाव आहे. यातील आरोपी आणि गोविंद हे दोघेही जेसीबी मशीन वर काम करतात. आज दुपारी दोघांनी खूप मद्य प्राशन  केले. बोलण्या बोलण्यात आपसातील वाद सुरू झाले. वाद घालत घालत शिरवणे गावातील  मुख्य रस्त्यावर दोघेही आले. त्यावेळी वादावादी सुरु असताना दोघांनी  मारामारी सुरु केली. आरोपीने रस्त्यावर पडलेली एक वीट उचलली आणि गोविंदच्या डोक्यात जोरात मारली. तेथेच तो खाली पडला. पडल्यावर काही वेळ विव्हळला आणि एकदम निपचित झाला. तो निपचित पडताच आरोपीने तेथून पलायन केले. आरोपीच्या विरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला असून त्याचा शोध घेतला जात आहे. अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक संभाजी भगत यांनी दिली. 

Saif Ali Khan attack case, Saif Ali Khan,
सैफ हल्ला प्रकरण : आरोपीचा चेहऱ्याच्या पडताळणीचा अहवाल पोलिसांना प्राप्त, न्यायवैद्यक प्रयोगशाळेचा अहवाल
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
Pune Municipal Corporation contract employee stabbed to death over immoral relationship in Kothrud
कोथरूडमध्ये अनैतिक संबंधातून तरूणाचा खून, पोलिसांकडून संशयित आरोपी ताब्यात
IT girl murder, rape case, Mumbai,
विश्लेषण : मुंबईत आयटी तरुणी हत्या, बलात्कार प्रकरणात तपासातील त्रुटींमुळे आरोपी निर्दोष… नेमके प्रकरण काय होते?
shoes of accused in Saif attack case seized Mumbai crime news
पोलिसांच्या हाती आणखी पुरावे; सैफ हल्ला प्रकरणातील आरोपीचे बूट जप्त
right to privacy is guaranteed under Article 21 of the Constitution
आरोपींनाही गोपनीयतेचा मूलभूत अधिकार आहेच!
Toddler killed by water tanker in pune
टँकरच्या चाकाखाली सापडून एक वर्षांच्या बालकाचा मृत्यू
accused akshay shinde encounter
अन्वयार्थ : हत्येचा गुन्हा दाखल कराच
Story img Loader