ताडी पीत असताना मोठ्या आवाजात बोलत असल्याने झालेल्या वादात एक इसमाने दुसऱ्याची हत्या केल्याचा प्रकार नवी मुंबईतील दिघा परिसरात घडला होता . या घटने नंतर आरोपीने पळ काढला होता. गुन्हे शाखेने समांतर तपास करीत आरोपीला अटक केली आहे.सोनु पांडे असे अटक इसमाने नाव आहे, तर राज उतेकर असे हत्या झालेल्या इसमाने नाव आहे. मयत राज त्याचे मित्र कल्पेश पाटील व अन्य एक जण दिघा ईश्वर नगर येथील ताडी माडी केंद्रात ताडी पित बसले होते. काही वेळाने परिसरात राहणारा सोनू पांडे हा सदर केंद्रात आला व काउंटर शेजारीच ताडी पित उभा राहिला.
हेही वाचा >>>नवी मुंबई: मोरा बंदरातील गाळामुळे जलप्रवासात खोळंबा; प्रवाशांकडून संताप व्यक्त
काही वेळाने राज याला हळू आवाजात बोल एवढ्या मोठ्यांदा का बोलतो असे म्हणाला या वरून दोघांचे वाद झाले त्यात सोनू याने राज याला बेशुद्ध पडेपर्यंत मारहाण केली. राज याच्या मित्रांनी त्याला घेऊन कळवा येथील रुग्णालयात दाखल केले मात्र तेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या बाबत २६ तारखेला गुन्हा नोंद झाल्यावर गुन्हे शाखेने २७ तारखेला अपरात्री आरोपीला याच परिसरात अटक केली.अशी माहिती पोलिसांनी दिली.