उरण : दिवाळीच्या पहिल्या अंघोळीसाठी परंपरेने पायाखाली प्रतिकात्मक नरकासून चिरडण्याची प्रथा आहे. त्यासाठी लागणारे मस्क मेलन (चिराट)हे फळ ही महागले आहे. हे एक फळ अडीच रुपयांना एक या दराने बाजारात विक्रीसाठी आले आहे. ही फळ पावसाळ्यात नैसर्गिकरित्या उगवणाऱ्या वेलीवर येतात. मात्र त्यासाठी जंगल आणि मोकळे पठार यावर ते येतात. मात्र सध्या मातीच्या भरावासाठी जंगल आणि मोकळे पठार नष्ट करण्यात आले आहेत.
त्यामुळे ही फळ कमी प्रमाणात मिळत आहेत. या फळांचे उत्पादन कमी आणि मागणी अधिक अशी स्थिती असल्याने दरवर्षी दिवाळीच्या वेळी या फळांचे दर वाढत आहेत. त्यामुळे दिवाळीतील नरकासूर ही आता महाग झाला आहे. या घटत्या नैसर्गिक फळ,फुले आणि विविध प्रकारच्या वनस्पतीमुळे या निसर्गातील फळ,फुलांची विक्री करून आपलं उदरनिर्वाह चालविणाऱ्या शेकडो आदिवासी कुटुंबातील व्यवसायावर परिणाम झाला आहे. उरणच्या डोंगर आणि जंगल परिसर आणि ओसाड मोकळ्या जागा कमी झाल्या आहेत. त्यामुळे पावसाळ्यात उगवणाऱ्या वनस्पतीचे प्रमाण कमी झाले आहे. त्यामुळेच सध्या वनस्पतींचे दर वाढले आहेत. तसेच आम्हाला त्यासाठी अधिकची मेहनतही करावी लागत असल्याची माहिती उरण मधील आदिवासी बेबी कातकरी यांनी दिली आहे.