पनवेल: आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे पनवेल परिसराचे भविष्याचे विकास नियोजन योग्यपद्धतीने होण्यासाठी तसेच विकास होत असताना स्थानिक शेतक-यांचे नुकसान होऊ नये यासाठी राज्य सरकारमध्ये पनवेलचे प्रतिनिधीत्व करणारे भारतीय जनता पक्षाचे आ. प्रशांत ठाकूर यांनी नैना प्राधिकरणामुळे भूमिपुत्रांचे होणारे फायदे याविषयी सभा घेण्याचे रविवारी जाहीर केले. भाजपच्या पनवेल शहरातील मध्यवर्ती कार्यालयात यासंदर्भात बैठक घेण्यात आली. या बैठकीत उरणचे अपक्ष आ. महेश बालदी आणि भाजपचे पनवेलमधील मुख्य पदाधिकारी उपस्थित होते. २३ डिसेंबरला नैना प्राधिकरणाबाबत पहिल्यांदा भाजप भव्य सभेमार्फत आपली भूमिका जाहीरपणे मांडणार आहे. भाजपने नैनाबाबतीत घेतलेल्या सकारात्मक पवित्र्यामुळे सहा दिवसांपासून उपोषण करणारे शेतकरी अजून संभ्रमात पडले आहेत. नैना बचाव विरुद्ध नैना हटाव असा संघर्ष पनवेलमध्ये होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा