ग्लोबल वार्मिग रोखण्यासाठी नैसर्गिक शेती करणे ही काळाची गरज बनल्याचे प्रतिपादन शेतीतज्ज्ञ, पद्मश्री सुभाष पाळेकर यांनी केले.
सतीश हावरे यांच्या ११ व्या स्मृती दिनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते.
रासायनिक आणि सेंद्रीय शेतीतील उत्पादनांच्या सेवनाने हृदयविकार, कर्करोग, मधुमेह आजार होतात. याला पर्याय म्हणून सर्वानी नैसर्गिक शेती करणे आवश्यक आहे, असे सांगतानाच पाळेकर यांनी नैसर्गिक शून्य अर्थसंकल्प शेतीचे महत्त्व पटवून दिले.
ते म्हणाले, नैसर्गिक शेती कशी करावी हे जाणून घेण्यासाठी विदेशातून लोक इथे येत आहेत. काही लोकांनी त्यावर प्रयोगही सुरू केली आहेत. त्यांना येथील नैसर्गिक शेतीची माहिती करून घ्यायची आहे. मात्र असे असतानाही राज्य कृषिमंत्रालय आणि फडणवीस सरकार याचा विचार करीत नसल्याबद्दल खंत व्यक्त केली.
यावेळी ज्येष्ठ समाजसेविका सिंधुताई सपकाळ, हावरे बिल्डर्सचे सुरेश हावरे, उज्ज्वला हावरे,पद्मश्री मधू मंगेश कर्णिक, पोलीस अधीक्षक शहाजी सोळंखे आदी मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी पाळेकर यांना सामाजिक सेवा जीवन गौरव पुरस्कार २०१६ ने सन्मानित करण्यात आले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा