नवी मुंबई : पोलिसांच्या सातत्यपूर्ण कारवाईमुळे एकाच ठिकाणी गांजा विकणे धोकादायक झाल्याने आता गांजा विक्रेते फिरस्तीप्रमाणे रोज जागा बदलून गांजा विकतात. असाच एक प्रकार समोर आला असून बस थांब्यावर गांजा विक्री करणाऱ्या दोन आरोपींना रबाळे पोलिसांनी अटक केली आहे. 

समशेर पीर खान, दिलीप बरुआ असे अटक आरोपींची नावे असून संजू उर्फ मोट, शम्मो, वसीम हे फरार आरोपी आहेत. गांजा विक्रीविरोधात नवी मुंबई पोलिसांनी नशा मुक्त नवी मुंबई हा उपक्रम राबवत असल्याने गांजा विक्री करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. त्यामुळे गांजा विक्री करण्यासाठी रोज जागा बदलली जात असल्याने पोलिसांनी त्यावरही नजर ठेवणे सुरु केले आहे. बदलेली जागा गांजा खरेदी करणाऱ्यांना मात्र माहिती असते. अशाच प्रकारे गांजा विक्री करण्यासाठी ऐरोलीतून मुलुंडकडे जाणाऱ्या गरम मसाला बस थांब्यावर गांजा विकणारे दोन संशयित पोलिसांना आढळून आले. दोघांना ताब्यात घेत झडती घेतली असता त्यांच्याकडे २० हजार रुपयांचा १ किलो गांजा आढळून आला.

Two arrested for stealing a vehicle in Pimpri
पिंपरी: वाहन चोरी करणारे दोघे अटकेत; आठ दुचाकी जप्त
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
ganja ulhasnagar court case
उल्हासनगर न्यायालयात चपलांच्या खोक्यातून गांजा पुरवण्याचा प्रकार; अज्ञात आरोपीचे न्यायालयाच्या खिडकीतून उडी घेत पलायन
bike thieves arrested loksatta news
कल्याण, नवी मुंबई, डोंबिवलीत मोटार सायकल चोरणारे उल्हासनगरमधून अटक
Gang involved in gold chain and vehicle theft arrested
सोनसाखळी, वाहनचोरी करणारी टोळी उघडकीस; सराईत अटकेत, दोन अल्पवयीन ताब्यात
Vandalism ,ransom , shopkeeper, Shivne area,
पुणे : दुकानदाराकडे खंडणीची मागणी करुन तोडफोड, शिवणे भागात सराइताची दहशत
Two arrested for illegally carrying pistols
बेकायदा पिस्तूल बाळगणारे दोघे अटकेत
torres investment scam loksatta news
Torres Scam : टोरेस घोटाळा प्रकरणात तिघांना अटक, २६ लाखांची रोकड जप्त

हेही वाचा – धान्य बाजारात दुकानदारांचे रस्त्यावर बस्तान

हेही वाचा – पनवेलमध्ये सकाळपासून कोकण पदवीधरांचे उत्साहात मतदान

काडीदार पाने, बिया फुले पाने अशा स्वरुपात सदर गांजा होता. सदर गांजा खरेदी आणि विक्रीसाठी संजू उर्फ मोट, शम्मो, वसीम हे आरोपींना मदत करत असल्याचे समोर आले. पोलिसांनी समशेर आणि दिलीप यांना अटक केली असून अन्य तिघांचा शोध सुरु आहे. या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक दयानंद वणवे हे तपास करीत आहेत. 

Story img Loader