Navi Mumbai Palm Beach Road Accident : दोन अवजड वाहनांच्या मधून दुचाकीवरून जात असताना दुचाकी घसरून दोन युवकांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच आज (१३ जानेवारी) दोन युवतींचा अपघातात मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या दोन तरुणी कॉल सेंटरवरून रात्रपाळी करून घरी परतत असताना त्यांच्या दुचाकीला कारने धडक दिली. यात एक युवती जागीच ठार झाली तर उपचार सुरू असताना दुसरीचा मृत्यू झाला. संस्कृती खोकले (वय २२) व अंजली पांडे (वय १९) अशी अपघातात मृत्यू झालेल्या युवतींची नावे आहेत. सकाळी पावणे सातच्या दरम्यान आपली रात्रपाळी करून अंजलीला बोनकोडे गावात सोडण्यास संस्कृती येत होती. बोनकोडे जवळ असणाऱ्या वीरशैव स्मशान भूमीनजिक त्या आल्या असता समोरून येणाऱ्या भरधाव कारने त्यांना धडक दिली. अपघात झाल्यावर कारचालक त्यांची मदत न करता निघून गेला. यात दुचाकीचालक संस्कृती जागीच ठार झाली तर अंजलीला आसपासच्या लोकांनी रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचार सुरू असताना तिचा मृत्यू झाला. प्राथमिक तापसानुसार समजलं आहे की त्या विरुद्ध दिशेने स्कूटर चालवत होत्या. या प्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय उपाळे पुढील तपास करीत आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा