नवी मुंबई: गांजा विक्रीप्रकरणी नवी मुंबई पोलिसांनी दोन आरोपींना अटक केले आहे. त्यांच्याकडून ९ लाख ४५ हजार रुपयांचा २३ किलो ६२५ गांजा जप्त केला आहे. या प्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.
हेही वाचा – नवी मुंबई : शिरवणेतील अतिधोकादायक इमारत रिकामी, ६१ नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवले
वाजिद अब्दुल लतीफ खान आणि निहाल गागट असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. शीव पनवेल महामार्गावर सानपाडा स्टेशननजीक असणाऱ्या एनएमएमटी बस स्थानकावर दोन युवक गांजा विक्रीस येणार असल्याची माहिती अंमली पदार्थ विरोधी कक्षाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नीरज चौधरी यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारावर सापळा लावून दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले. त्यांची अंगझडती केली असता गांजा आढळून आला. त्याचे वजन केले असता २३ किलो ६२५ ग्रॅम भरले. ज्याचे मूल्य ९ लाख ४५ हजार आहे. सदर आरोपींना अटक करण्यात आले असून गांजा कोणाला देण्यात येणार होता आणि कुठून आणला होता याचा तपास सुरु आहे.