नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रात असलेल्या इमारतींचे सर्वेक्षण करण्यात आले असून शहरात ५२७ धोकादायक इमारती असून ३१ मार्च २०२५ पूर्वी या इमारतींचे संरचनात्मक परिक्षण करुन अहवाल पालिकेला सादर करण्याचे आवाहन नवी मुंबई महापालिकेतर्फे संबंधित इमारतीमधील नागरीकांना करण्यात आले आहे.
नवी मुंबई महापालिकेने या वर्षासाठी सर्वेक्षण करण्यात आले असून सर्वेक्षणानंतर शहरात ५२७ इमारती धोकादायक इमारती म्हणून घोषित करण्यात आलेल्या आहेत. ज्या इमारतींचा वापर सुरू होऊन ३० वर्षांपेक्षा अधिक काळ झाला आहे, अशा इमारतींचे नवी मुंबई महानगरपालिकेकडे नोंदणी केलेल्या बांधकाम अभियंत्याकडून किंवा संरचना अभियंत्याकडून संरचना परीक्षण अर्थात स्ट्रक्चरल ऑडीट करून घेणे अनिवार्य आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

३० वर्षापेक्षा जास्त काळ इमारतीचा वापर किंवा इमारतीस भोगवटा प्रमाणपत्र प्राप्त झाले त्या इमारतीचा वापर सुरु झाला अशा दिवसापासून मोजावयाचा आहे. नेमलेल्या संरचना अभियंत्याने शिफारशी केलेली दुरूस्तीची कामे पूर्ण झाल्याचे व ते बांधकाम सुस्थितीत असल्याचे प्रमाणपत्र नवी मुंबई महानगरपालिकेकडे सादर करावे लागणार आहे.याबाबत टाळाटाळ करणाऱ्यांस २५ हजार रुपये अथवा सदर मिळकतीच्या वार्षिक मालमत्ता कराची रक्कम यापैकी जी जास्त असेल तितक्या रक्कमेचा दंड ठोठवावयाची तरतूद नियमावलीनुसार करण्यात आली आहे.

हेही वाचा…नवी मुंबई : महाग घरे विक्रीविना, घरांच्या किमती कमी करण्याचा सिडकोचा प्रस्ताव

नवी मुंबई महानगरपालिकेने संरचनात्मक परीक्षक (स्ट्रक्चरल इंजिनियर) यांची यादी नवी मुंबई महानगरपालिकेच्या http://www.nmmc.gov.in संकेतस्थळावर उपलब्ध करून दिलेली आहे.

हेही वाचा…चौकांचे काँक्रीटीकरण अर्धवटच, पावसाळ्यानंतरही कामे जैसे थेच

३० वर्षापेक्षा जास्त काळ झालेल्या इमारतीच्या संरचनात्मक परीक्षणाचा अहवाल ३१ मार्च २०२५ पूर्वी संबधित विभागाचे सहाय्यक आयुक्त तथा विभाग अधिकारी किंवा सहाय्यक संचालक नगररचना, नवी मुंबई महानगरपालिका यांच्याकडे सादर करायचा आहे. धोकादायक झालेल्या इमारतींचा, घरांचा वापर केल्यामुळे जिवित व वित्त हानी होऊ शकते म्हणून नागरिकांकडून धोकादायक इमारतींचा , घराचा रहिवास, वापर तात्काळ थांबविण्यात यावा असे आवाहन नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आले आहे. अन्यथा दुर्दैवी अपघात घडल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी संबधितांची राहणार आहे. सोमनाथ केकाण, नगरचनाकार, नवी मुंबई महापालिका

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Navi mumbai 527 dangerous buildings citizens must submit reports to municipality by march 31 2025 sud 02