नवी मुंबई : अवैध प्रवासी वाहतूक, अवैध मालवाहतूक, मद्य पिऊन वाहन चालवणे, भरधाव वाहने हाकणे असे प्रकार करून कायद्याचा भंग करणाऱ्या एक हजारहून अधिक वाहनांवर नवी मुंबई प्रादेशिक परिवहन कार्यालयाने कारवाई केली असून त्यातून तब्बल ५० लाख रुपयांहून अधिक दंडवसुली केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शहरातील सायन-पनवेल महामार्गावरील तुर्भे, बेलापूर, नेरुळ या ठिकाणी वाहनांची वर्दळ असते. परंतु यामध्ये अवैध वाहतूक करणाऱ्या वाहनांचाही समावेश असतो. वेगमर्यादा उल्लंघन, ड्रिंक अँड ड्राईव्ह, अवैध प्रवासी वाहतूक तसेच वाहनांच्या क्षमतेपेक्षाही अधिक प्रवासी नेणे इत्यादी अवैध वाहतूक केली जाते. यामुळे अपघाताच्या घटना घडतात. त्यामुळे आरटीओच्यावतीने अशा वाहनांवर कारवाई करण्यात येत असून जानेवारीपासून आत्तापर्यंत अवैध वाहतूक करणाऱ्या १ हजार १४ वाहनांवर कारवाई करून ५० लाखांहून अधिक दंडात्मक वसुली करण्यात आली आहे.

हेही वाचा – नवी मुंबई : महापालिकेत भटक्या श्वानांचा वावर, सर्व प्रवेशद्वारांवर सुरक्षा रक्षक, नवी मुंबई महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष

नवी मुंबई शहरात वारंवार अवैध प्रवासी वाहतूक, अवैध माल वाहतूक सुरूच असते. त्यावर आरटीओकडून वारंवार कारवाईही केली जाते. मात्र तरी देखील शहरात आजही अवैध वाहतूक केली जात आहे. यामध्ये वेग मर्यादा उल्लंघन, ड्रिंक अँड ड्राईव्ह, अवैध प्रवासी वाहतूक तसेच वाहनांच्या क्षमतेपेक्षाही अधिक प्रवासी नेणे इत्यादी अवैध वाहतूक, एखाद्या मालाची वाहतूक कारायची असेल मालवाहतूक व्यासायिक वाहनाने करावी लागते. मात्र अनेकदा काही खासगी वाहने अल्प दरात प्रवासी वाहतुकीबरोबर व्यसायिक मालवाहतूक करताना दिसत असतात. त्यामुळे अवैध वाहतुकीला आळा घालण्यासाठी नवी मुंबई आरटीओ विभागाकडून सातत्याने कारवाई करण्यात येत आहे. जानेवारीपासून आतापर्यंत एकूण १ हजार १४ वाहनांवर कारवाई करण्यात आली असून ५० लाख ७८ हजार रुपये दंडात्मक वसुली करण्यात आली आहे.

हेही वाचा – नवी मुंबई : दंड कमी करण्यासाठी वाहनचालकांची लोकअदालतीमध्ये धाव

अवैध वाहतूक करण्याऱ्या चालकांवर वचक बसावा यासाठी वाहनांवर ही कारवाई करण्यात येत आहे. यापुढे ही अवैध वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्यात येईल. – सुरेंद्र निकम, उपप्रादेशिक अधिकारी (अतिरिक्त कार्यभार), आरटीओ, नवी मुंबई

  • अवैध प्रवासी वाहतूक ९३
  • ड्रिंक अँड ड्राईव्ह ५
  • अवैध वाहतूक २७७
  • भरधाव वाहन कारवाई ६३९
Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Navi mumbai action against 1000 vehicles for illegal transportation a fine exceeding fifty lakh rupees ssb
Show comments