नवी मुंबई : नवी मुंबई शहरामध्ये खोदकामे थांबायचे नाव घेत नाहीत. खोदकामांबाबतची मुदत २५ मे पर्यंत देण्यात आली होती. ही मुदत संपली असून अजूनही शहरात सर्वत्र खोदकामे सुरुच असल्याचे चित्र पाहायला मिळत आहेत. त्यामुळे पावसाळा काही दिवसांवर आला असतांना शहरभर सुरु असलेली खोदकामं कधी संपतील असा प्रश्न सामान्य नागरीक विचारत आहेत.

नवी मुंबई शहरातील विविध चौकांच्या तसेच रस्त्यांच्या कॉक्रिटीकरणांची कामे सुरु आहेत. नव्याने रस्त्याच्या खोदकामाला पालिकेने परवानगी देणे बंद केली असली तरी अत्यावश्यक कामे म्हणून खोदकामे करण्यात येत आहेत. त्याचबरोबर कुठे मलनिस्सारण वाहिन्या तर कुठे कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने पाणीपुरवठालाईन बदलण्याची कामे सुरु आहेत. या खोदकामांमुळे नागरीकांची डोकेदुखी संपताना दिसत नाही. नागरिकांना व विशेषतः पादचाऱ्यांना मोठी अडचण निर्माण होत आहे पालिकेने पावसाळ्यापूर्वी हे कामे पूर्ण करावीत अन्यथा नागरीकांच्या रोषाला पालिकेला सामेरे जावे लागणार असल्याचे दिसत आहे.

हेही वाचा… नवी मुंबई : नालेसफाईची मुदत संपूनही सफाई अपूर्ण

सीवूड्स पश्चिम विभागात मॉलमुळे मुख्य रस्त्यावर गर्दी असते. याच परिसरात सीवूड्स पूर्व पश्चिम जोडणाऱ्या उड्डाणपुलाखाली चौक कॉंक्रीटीकरणासाठी खोदकाम सुरु केले व वाहतूक विभागाने हा रस्ता १० दिवस बंद असल्याचे जाहीर केले. त्यामुळे दुचाकी, चारचाकी चालकांना मोठा वळसा घेऊन जावे लागत आहे. त्यामुळे ज्या ठिकाणी खरंच आवश्यक असलेली कामे करावीत अशी मागणी माजी नगरसेवक भरत जाधव तसेच शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे समीर बागवान व अन्य़ पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहेत.

हेही वाचा… नवी मुंबईतील स्वराज क्रशर स्टोन एल.एल.पी. खाण घोटाळा कर्नाटकच्या खाण घोटाळ्यापेक्षा गंभीर: सामाजिक संस्थेसह एनसीपीचा आरोप

टेलिफोन निगम ,महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण मंडळ व इतर संस्थांची चर काढणे, टेलिफोनसाठी रस्ता कटींग करणे ही कामे बंद करण्यात आली आहेत. महापालिकेची कामे सुरु असून ती आवश्यक असल्याने कामे करण्यात येत आहेत.नागरीकांना त्रास होणार नाही याबाबत कामे करताना योग्य ती खबरदारी घेण्याचे आदेशित करम्यात आले आहे.- संजय देसाई,शहर अभियंता

Story img Loader