नवी मुंबई : विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी (ता.११ ऑक्टोबर) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पाच्या पहिल्या धावपट्टीवरील कॅलिब्रेशनची चाचणी घेण्यात आली. ही चाचणी यशस्वी ठरल्याचे प्रमाणपत्र नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला मिळाल्याने पुढील आर्थिक वर्षाच्या पहिल्याच महिन्यात एप्रिलमध्ये विमानतळावर पहिले मालवाहू विमान उड्डाण निश्चित झाल्याची माहिती अदानी समुहाच्या एका वरिष्ठ अधिका-याने नाव न प्रसिद्ध करण्याच्या अटीवर दिली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

एप्रिल २०२५ मध्ये नवी मुंबई विमानतळ प्रकल्पाचा पहिला टप्पा सुरू होण्याच्या हालचाली सिडको मंडळ आणि अदानी इंटरप्रायजेस कंपनीमध्ये युद्धपातळीवर सुरू झाल्या असल्याची माहिती सूत्रांकडून समजते. पुढील पाच महिन्यांत म्हणजे २०२५ एप्रिल महिन्यापर्यंत विमानतळ प्रकल्पातील पहिल्या टप्याचे काम पूर्ण करण्यासाठी युद्धपातळीवर प्रकल्प ठिकाणी काम दिवसरात्र सुरू आहे. ११ ऑक्टोबरला मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या धावपट्टीवरील कॅलिब्रेशन चाचणी लढाऊ विमान सी-२९५ मार्फत घेण्यात आली. धावपट्टीची कॅलिब्रेशन तपासणी यशस्वी झाल्यामुळे मालवाहू विमानाच्या या पहिल्या टप्यातील धावपट्टीवरुन लवकरच उड्डाणासाठी अदानी समूहाने कंबर कसल्याची चर्चा आहे.

हे ही वाचा… ‘पामबीच’चा सायकल ट्रॅक वादाच्या फेऱ्यात; ठेकेदारही अडचणीत, चौकशी प्रक्रिया सुरू

सिडकोच्या वरिष्ठ अधिका-यांनी यापूर्वी अनेकदा जाहीर व्यासपीठावर, २०२५ मार्च महिन्यापर्यंत विमानतळाचा पहिला टप्पा सुरू करू. तसेच या विमानतळात पहिले काही काळ मालवाहू विमानांची येजा सुरू होईल, असे जाहीर केले आहे. अदानी कंपनीच्या एका प्रवक्त्याने नाव न प्रसिद्ध करण्याच्या अटीवर दिलेल्या माहितीनूसार विमानतळातील ३,७०० मीटर लांबीच्या धावपट्टीवरील केलीब्रेशनची यशस्वी चाचणी झाल्याचा अहवाल नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीच्या आठवड्यात अदानी कंपनीला मिळाल्यामुळे पुढील १७० दिवसांत विमानतळ प्रकल्पातील पहिला टप्प्याचे काम पूर्ण करण्यासाठी विमानतळात युद्धपातळीवर कामाचे नियोजन केले आहे. आर्थिक वर्ष २०२५ च्या शुभारंभाला हे विमानतळ सुरू व्हावे यासाठी अदानी कंपनीसुद्धा आग्रही असल्याचे समजते. याबाबत सिडको मंडळाच्या अधिका-यांनी बोलण्यास नकार दिला आहे. नवी मुंबई विमानतळावर सर्वाधिक विमान उभे करू शकतो एवढ्या क्षमतेचे हे विमानतळ आहे. तसेच या विमानतळामध्ये विमानांमध्ये लागणारे इंधन मोठ्या प्रमाणात साठवणूक करुन विमानांमध्ये भरण्याची क्षमता असणार असल्याचे सांगितले जात आहे.

हे ही वाचा… Maharashtra Assembly Election Result Live : महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचं नाव आज जाहीर होणार? राजकीय घडामोडींना वेग

कॅलिब्रेशन तपासणी यशस्वी

११ ऑक्टोबरला मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या धावपट्टीवरील कॅलिब्रेशन चाचणी लढाऊ विमान सी-२९५ मार्फत घेण्यात आली. धावपट्टीची कॅलिब्रेशन तपासणी यशस्वी झाल्यामुळे मालवाहू विमानाच्या या पहिल्या टप्यातील धावपट्टीवरुन लवकरच उड्डाणासाठी अदानी समूहाने कंबर कसल्याची चर्चा आहे.

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Navi mumbai airport may open for flight service in april asj