नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पाच्या पहिल्या टप्यातील धावपट्टी व इतर काम पुर्ण होण्याच्या वाटेवर असल्याने या विमानतळातून २०२५ मार्च अखेरीस मालवाहतूकीचे विमान वाहतूक सूरु करण्यासाठी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रा. लिमीटेड (एनएमआयएएल) कंपनीने कंबर कसली आहे. विमानतळ सूरु करण्यापूर्वी या विमानतळातील धावपट्टीवरील उपकरण यंत्रांवरील वैमानिकांना मिळणारी माहितीची चाचणी सोमवारपासून भारतीय विमानतळ प्राधिकरणाने सूरु केली आहे. ही चाचणी होत असताना सोमवार ते बुधवार असे तीन दिवस विमानतळातील धावपट्टी क्रमांक २६/०८ च्या काही अंतरावरुन लहान विमानाचे उड्डाण करावे लागते. चाचणीसाठी विमान धावपट्टीलगत घिरट्या घालत असल्याने परिसरातील नागरीकांची घिरट्या घालणारे विमान पाहण्यासाठी उत्कंठा वाढत आहे.
पुढील सात महिन्यात नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन पहिले मालवाहू उड्डाण करण्यासाठी एनएमआयएएल कंपनीने कंबर कसली आहे. त्यासाठी सिडको मंडळाचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल आणि सह व्यवस्थापकीय संचालक शान्तनू गोयल हे वेळोवेळी प्रकल्पाच्या कामाचा पाठपुरावा घेत आहेत. नवी मुंबई विमानतळावरील धावपट्टी व विविध तांत्रिक उपकरणांची चाचणीचे अनेक प्रयोग भारतीय विमानतळ प्राधिकरणाकडून होणार आहेत.
हे ही वाचा… नवी मुंबई: निर्जनस्थळी गस्तीचा प्रस्ताव कागदावरच?
हे ही वाचा… Yashashree Shinde : यशश्री शिंदेचा मोबाइल रेल्वे ट्रॅकजवळ मिळाला, उरण हत्याकांडांचं गूढ उकलणार
एनएमआयएएल कंपनीच्या प्रवक्त्यांनी दिलेल्या माहितीनूसार तांत्रिक अजून ब-याचशा चाचण्या विमानतळावर यापूढे सूरुच राहणार असून या चाचण्यांचा अहवालानंतर प्रत्यक्षात विमानतळ वापरासंदर्भातील परवानगींसाठी हालचाली सूरु होणार आहेत. सोमवारपासून लहान विमानाने धावपट्टी क्रमांक २६/०८ यावरील उपकरणीय यंत्रातून वैमानिकांना मिळणारी माहिती (इन्स्ट्रुमेंट लँडिंग सिस्टम) ची चाचणी सूरु झाली आहे. जुलै महिन्यात अशीच चाचणीचे नियोजन केले होते. परंतू मुसळधार पावसामुळे ही चाचणी पुढे ढकलण्यात आली. याच चाचणीचा भाग सोमवारपासून पुन्हा सूरु झाल्याने विमानतळावर विमानाच्या घिरट्या वाढल्या आहेत.