नवी मुंबईतील गावठाणामध्ये तसेच झोपडपट्टीभागात वाढलेल्या घरांमुळे व या प्रत्येक घरांना पाणीमीटर कक्षेत आणल्याने आता पालिकेच्या पाणीबिल वसुलीतही वाढ होणार असून दोन महिन्यात १२ कोटीपेक्षा अधिक पाणीबिल आकारणीत आता जवळजवळ १ कोटी रुपयांची वाढ होण्याची शक्यता पालिकेच्या पाणीपुरवठा व अभियंता विभागाने दिली आहे.

हेही वाचा >>> नवी मुंबईच्या राजीव गांधी मैदानात स्वच्छता लीग यशस्वी ,तर मानवी साखळीचे नियोजन मात्र शून्य

महापालिका क्षेत्रातील मुळ गावठाणातील घरे तसेच झोपडपट्टीतील घरे मोठ्यापटीत वाढलेली आहेत. परंतू या घरांना पाण्यासाठी मूळ घरासाठी घेतलेल्या नळजोडणीतूनच पाणी दिले जात होते. तसेच झोपडपट्टी भागातही एकाच्या बिलाचीच वसुली केली जात होती. परंतू पालिकेने याबाबत सर्वे केला असून नवी मुंबई शहरातील ८ विभाग कार्यालयाअंतर्गत झोपडपट्टी व गावठाण यांना पाणी मीटरच्या कक्षेत आणण्यात येत असून त्यामुळे पालिकेच्या दोन महिन्यातून येणाऱ्या पाणीबिलात जवळजवळ १ करोड रुपये वाढण्याची शक्यता पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने दिली आहे. मूळ गावठाणांमध्ये आता एका घराच्या जागेवर मोठ्या इमारती झाल्या,त्यामध्ये अनेक खोल्या तयार करुन भाड्याने दिल्याचे चित्र आहे.परंतू मूळ घरासाठी घेतलेल्या एकाच नळजोडणीवर अनेक घरांना पाणीपुरवठा केला जात होता.याच प्रकारे झोपडपट्ट्यांमध्येही अनेक झोपडपट्ट्या वाढल्या, रहिवाशी वाढले पण पाणी जोडणी न घेता फुकटात पाणी वापर तसेच पाणी चोरी असे प्रकार सुरु होते .तो प्रकार बंद होणार आहे. त्यामुळे पालिका फुकटात तसेच चोरी करुन पाणी वापरच १०० टक्के बंद करत असल्याने पालिकेच्या उत्पन्नात वाढ होणार आहे. २०११च्या आधीच्या झोपडपट्टी तसेच २०११च्यानंतर झालेल्या झोपडपट्ट्यांनाही ५ ते १५ घरे मिळून नळखांबद्वारे पाणी पुरवठा केला जाणार आहे. त्यामुळे आता पालिकेच्या उत्पन्नात वाढ होणार आहे.

हेही वाचा >>> नवी मुंबई : माथाडी कामगारांचे प्रलंबित प्रश्न महिन्यातभरात सोडविणार ; राज्य कामगार मंत्री सुरेश खाडे यांचे आश्वासन

महापालिकेच्या २ महिन्याच्या पाणीबिलाची वसुलीची रक्कम १२ कोटीच्या पुढे असून जवळजवळ ४० हजार कुटुंबे या पाणीबिलाच्या कक्षेत येणार असल्याने जवळजवळ दोन महिन्यात वसुली रकमेत १ कोटी रुपयांची वाढ होणार आहे.

नवी मुंबईत फुकटात पाणी वापरावर निर्बंध आणण्यात आले असून प्रत्येक पाणीवापर करणारा नागरीक पाणीबिलाच्या कक्षेत येणार आहे. पालिकेचे पाणीबिल दोन महिन्यातून एकदा दिले जाते. जवळजवळ ४० हजारापेक्षा अधिकजन पाणीमीटरच्या कक्षेत येणार असल्याने जवळजवळ दोन महिन्याच्या पाणीबिलात १ कोटीची वाढ होण्याची शक्यता आहे. – अरविंद शिेंदे ,कार्यकारी अभियंता,पाणीपुरवठा विभाग

Story img Loader