नवी मुंबई : देशातील स्वच्छ शहरांच्या सर्वेक्षणात नवी मुंबईने यंदाही मानाचे स्थान पटकाविले असून देशातील तिसऱ्या क्रमांकाचे सर्वात स्वच्छ शहर म्हणून नवी मुंबईला गौरवण्यात आले आहे. यंदा मध्य प्रदेशातील इंदोर पाठोपाठ गुजरातमधील सुरत हे शहर संयुक्तपणे प्रथम क्रमांकाचे स्वच्छ शहर ठरले आहे. या दोन शहरांना प्रथम क्रमांक विभागून देण्यात आले आहे.
नवी मुंबईचा तांत्रिकदृष्ट्या तिसऱ्या क्रमांक आला आहे. विशेष म्हणजे कचरा मुक्त शहरांच्या यादीत सेव्हन स्टार हे अतिशय प्रतिष्ठेचे मानले जाणारे मानांकन यंदा नवी मुंबईला मिळाले आहे. असे मानांकन मिळवणारे सुरत नंतर नवी मुंबई हे दुसरे शहर ठरले आहे. गेल्या काही वर्षात स्वच्छतेच्या आघाडीवर नवी मुंबई सातत्यपूर्ण कामगिरी करताना दिसत आहे.
आणखी वाचा-अटल सेतूवरील वाहतूक नियमनाची जबाबदारी मुंबई पोलिसांकडे
नवी मुंबई महापालिकेने या आघाडीवर राबवलेल्या वेगवेगळ्या योजना नावाजल्या गेल्या आहेत. अभिजीत बांगर यांच्याकडे आयुक्त पदाची धुरा असताना त्यांनी नवी मुंबई देशातील पहिल्या क्रमांकाचे स्वच्छ शहर ठरावे यासाठी प्रयत्नपूर्वक मोहिमा राबवल्या. त्यावेळी नवी मुंबईचा क्रमांक तिसरा आला होता. हे तिसऱ्या क्रमांकाचे स्वच्छते शहर ठरले आहे. पहिल्या क्रमांकासाठी सुरत आणि इंदोर या दोन शहरांची संयुक्तपणे निवड झाल्याने तांत्रिकदृष्ट्या नवी मुंबई हे तिसऱ्या क्रमांकाचे स्वच्छ शहर ठरले आहे. राष्ट्रपती द्रोपदी मुरमु यांच्या हस्ते दिल्ली येथे झालेल्या एका मोठ्या कार्यक्रमात महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर अतिरिक्त आयुक्त सुजाता ढोले आणि घनकचरा विभागाचे प्रमुख बाबासाहेब राजळे यांनी हा पुरस्कार स्वीकारला.