नवी मुंबई : नवी मुंबईत गेल्या काही दिवसांपासून भिकाऱ्यांची संख्या वाढली आहे. हे भिकारी सिग्नलवर मॉलच्या बाहेर, गर्दी असलेल्या मिठाई दुकानाबाहेर मोठ्या संख्येने आढळून येतात. शिवाय घणसोली, सीवूड्स, सानपाडा उड्डाणपुलाखाली पथारी त्यांनी पसरलेली असते. त्यामुळे अस्वच्छता, भांडणे यातून छोटे मोठे गुन्हे घडत आहेत. या समस्येबाबत मनपा व पोलीस प्रशासन उदासीन असल्याचे दिसून येत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नवी मुंबईत भिकाऱ्यांनी अनेक ठिकाणी उच्छाद मांडला आहे. रस्त्याने चालत असताना दोन-चार मुले किंवा तान्हे मूल कडेवर घेतलेली महिला पैसे द्या म्हणून मागे लागतात. कितीही दुर्लक्ष केले किंवा झिडकारले तरी पैसे घेतल्याशिवाय पिच्छा सोडत नाहीत. भीक मागताना तरुण जोडपी, महिला, मुलामुलींचा समूहाला लक्ष्य केले जाते, अशी प्रतिक्रिया सतीश कांबळे या वाशीतील राहिवशाने दिली. घणसोली उड्डाणपुलाखाली असणाऱ्या भिकाऱ्यांना काही महिन्यांपूर्वी हुसकावून लावण्यात आले होते. मात्र हुसकावून लावले की ते अन्यत्र कुठे तरी जाऊन तेच काम करतात. सध्या सीवूड्स ग्रँड सेंटर मॉल परिसरात त्यातील अनेक जण राहत आहेत.

हे सर्व भिकारी रात्री पदपथावर झोपलेले असतात. त्यामुळे एखाद्या गाडीचे नियंत्रण सुटून गाडी पदपथावर चढली तर मुंबईतील घटनेप्रमाणे मोठी जीवितहानी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. येथे स्वीट मार्ट, चहा, वडापाव समोसा, पाणीपुरी अशा दुकानांची रेलचेल आहे. या भिकाऱ्यांना खाद्य पदार्थ दिले तरी नको असतात पैशांनीच मागणी केली जाते असा अनुभव सारिका पडवळ यांनी सांगितला. या परिसरातील रहिवासी संकुलात भुरट्या चोरींच्या प्रमाणातही वाढ होत आहे. हे लोक नेमके कोण आहेत, कुठून आले आहेत, यात कोणी बांगलादेशी आहेत का, याची तपासणी करण्याची गरजही परिसरातील रहिवाशांनी व्यक्त केली.

या समस्येविषयी काही तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत. संबंधित पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना कारवाईच्या सूचना केल्या आहेत.

पंकज डहाणे, पोलीस उपायुक्त परिमंडळ एक

सीवूड्स मॉल परिसर आणि रेल्वे स्थानका बाहेरील मुख्य रस्त्यावर त्याचप्रमाणे नजिकच्या उड्डाणपुलाखाली अनेक बेघर, निराश्रित त्याचप्रमाणे भिकारी यांच्या वाढत्या संख्येवर सातत्याने नवी मुंबई महानगर पालिका आणि पोलिस यांचे कडे पाठपुरावा करत आहे. मात्र दोन्ही यंत्रणांमधील जबाबदार अधिकारी एकमेकांकडे बोट दाखवण्याचे काम करतात. कोणताही अनुचित प्रकार घडल्यास दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यांना जबाबदार धरून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात यावेत.

समीर बागवान, उपशहर प्रमुख, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे</strong>