माजी मंत्री आणि भाजपाचे आमदार गणेश नाईक यांच्या नातवाला मारहाण करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. क्षुल्लक कारणावरुन बुधवारी मुरबाडजवळच्या टोकावडेजवळ ही मारहाण करण्यात आली. गणेश नाईक यांचे नातू आणि माजी खासदार संजीव नाईक यांचे पुत्र संकल्प संजीव नाईक आणि त्याचा मित्र तजेंद्रसिंग हरजितसिंग यांना मारहाण केल्याप्रकरणी टोकावडे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
संकल्प नाईक मित्र तजेंद्रसिंग मंत्री याच्यासह कृषी केंद्र शोधत असताना तळवली गावाजवळ पोहोचले. तिथे त्यांनी आपली चारचाकी गाडी अचानक वळवली. यावेळी मागून येणारी दुचाकी कारला धडकली. खाली पडलेला दुचाकीस्वार प्रवीण लिहेयाची विचारपूस करण्यासाठी गेलेल्या संकल्प नाईक आणि तजेंद्रसिंग मंत्री यांना निलेश देसले आणि त्यांच्या तीन साथीदारांनी मारहाण केली.
आणखी वाचा