नवी मुंबई – वर्षा अखेरीची धामधूम सुरु असताना आयोजित करण्यात आलेल्या ठाणे जिल्हा ग्रंथोत्सवच्या उद्घाटनाच्या सत्रात आणि पहिल्याच दिवशी वाचकांची अगदी तुरळक गर्दी दिसून आली. सायंकाळी या गर्दीत वाढ झाली असली तरी हा ग्रंथोत्सव शनिवार, रविवार सोडून आडवारी का आयोजित करण्यात आला असा प्रश्न उपस्थित होत आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
विविध साहित्य प्रकारांतील पुस्तकांचे प्रदर्शन, वाचन संस्कृतीविषयक विचारमंथन, साहित्यिकांचे परिसंवाद असे दोन दिवस या ग्रंथोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. परंतु, पहिल्याच दिवशी या ग्रंथोत्सवाला वाचक प्रेमींची खूपच कमी हजेरी लागल्याचे दिसून आले. सुटीच्या दिवशी ग्रंथोत्सव आयोजित करण्याऐवजी आडवारी आयोजित केल्यामुळेच वाचकांची उपस्थिती रोडावल्याची प्रतिक्रिया उपस्थितांकडून उमटत आहे.
नवीन पुस्तकांची वाचकांना ओळख व्हावी, विविध पुस्तकं वाचकांना हाताळता यावी तसेच वाचक आणि साहित्यिक यांच्यात संवाद घडावा यासाठी महाराष्ट्र शासनाच्या उच्च आणि तंत्र शिक्षण विभाग, ग्रंथालय संचालनालय आणि जिल्हा ग्रंथालय अधिकारी यांच्या संयुक्त विद्यमाने ३० व ३१ डिसेंबर असे दोन दिवस कोपरखैरणे येथील ज्ञान विकास संस्थेत “ठाणे ग्रंथोत्सव २०२४” चे आयोजन करण्यात आले आहे. या ग्रंथोत्सव अंतर्गत ग्रंथप्रदर्शन आणि साहित्यिक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. ग्रंथोत्सवाच्या पहिल्या दिवशी महाराष्ट्र राज्याचे ग्रंथालय संचालक अशोक गाडेकर यांच्या हस्ते या उत्सवाचे उद्घाटन झाले. या उद्घाटनापूर्वी मोठ्या उत्साहात ग्रंथदिंडी काढण्यात आली होती. परंतु, अयोग्य दिवशी नियोजन केल्यामुळे उद्घाटना वेळी तसेच पहिल्या दिवशी राबविण्यात आलेल्या कार्यक्रमाला वाचक आणि साहित्यिक प्रेमींची अपेक्षित प्रमाणे गर्दी पाहायला मिळाली नाही. त्यामुळे हा ग्रंथोत्सव अयशस्वी ठरल्याची चर्चा होऊ लागली आहे.
ग्रंथोत्सव आयोजन करण्याची जागा चुकली
ठाणे जिल्ह्यात शंभरच्या आसपास ग्रंथालय आहेत. त्यापैकी या ग्रंथोत्सवाला केवळ १५ ते २० ग्रंथालयांच्या प्रतिनिधीनी उपस्थिती लावली आहे. या ग्रंथोत्सवाचे आयोजन जिल्ह्याच्या मध्यभागी केले असते तर, या प्रदर्शनाला गर्दी झाली असती, अशी खंत उपस्थित काही साहित्यप्रेमींनी व्यक्त केली. त्यातच, हा उत्सव सोमवार आणि मंगळवार अशा कामाच्या दिवशी भरवण्यात आल्याने सुटीच्या दिवशी होणारी गर्दीही या महोत्सवाला लाभली नाही, असेही ते म्हणाले.
ग्रंथोत्सवाचे आयोजन करण्यासंदर्भात आमच्या समितीची बैठक झाली होती. त्या बैठकीत सर्वांच्या सहमतीने ३० आणि ३१ डिसेंबरला आयोजन करण्याचे ठरविले. ग्रंथोत्सवाबद्दल नागरिकांना कळावे यासाठी समाजमाध्यमांवर जनजागृती करण्यात आली होती. – प्रशांत पाटील, जिल्हा ग्रंथालय अधिकारी, ठाणे</p>