नवी मुंबई : नवी मुंबई पालिकेने तयार केलेला प्रारूप विकास आराखडा आणि त्यात सिडको मालकीच्या भूखंडावर टाकण्यात आलेले आरक्षण हे तुमच्या अधिकार क्षेत्रा बाहेरील बाब असून यामुळे मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाची बेअदबी करणारे आहे. तेव्हा हा प्रारूप विकास आराखडा तात्काळ मागे घेण्यात यावा. त्यात सुधारणा करूनच तो नंतर प्रसिद्ध करण्यात यावा अशी सूचना वजा नोटीस सिडकोने पालिकेला दिली आहे. पालिकेनेही त्याला जशास तसे उत्तर दिले असून नवी मुंबई पालिकेने प्रसिद्ध केलेला प्रारूप विकास आराखडा हा महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन नगररचना अधिनियम १९६६ च्या कलम २६(१) अन्वेय प्रसिद्ध करण्यात आला असून तो योग्य आहे असे उत्तर दिले आहे. त्यामुळे विकास आराखडा वरून सिडको पालिका प्रशासनात चांगलाच कलगी तुरा रंगला असल्याचे दिसून येत आहे. विशेष म्हणजे पालिकेने सिडकोच्या या सुचेनेची तक्रार नगरविकास विभागाकडे केली आहे.

हेही वाचा >>> कल्याण- तळोजा मार्गावरील खड्यांनी घेतला दुचाकीस्वाराचा जीव; मार्गाची दुरुस्ती करण्यास स्थानिक शेतकऱ्यांचा विरोध

crores of rupees seized from car in khed shivapur toll naka area
अन्वयार्थ : हजार कोटी सापडले, त्याचे पुढे काय झाले?
BJP Devendra Fadnavis Assets Net Worth Updates in Marathi
Devendra Fadnavis Income : उपमुख्यमंत्र्यांची एकूण संपत्ती किती?…
Shivaji Park ground, Shivaji Park, MNS Shivaji Park,
शिवाजी पार्कचे मैदानाचा निर्णय गुलदस्त्यात, महायुतीने मैदान अडवल्यामुळे ४५ दिवसांची मर्यादा संपल्याचा मनसेचा आरोप
maharashtra assembly election 2024 traffic diversions in pune city on occasion of pm modi visit
पंतप्रधानांच्या दौऱ्यानिमित्त शहरात वाहतूक बदल; स. प. महाविद्यालय परिसरातील रस्ते वाहतुकीस बंद
Narendra Modi statement that Congress wants to end OBC reservation
काँग्रेसला ओबीसी आरक्षण संपवायचे -मोदी
Dharavi Redevelopment Dharavi Adani Small and Micro Enterprises
धारावीच्या पुनर्विकासाचे मृगजळ
Rohit Pawar scandal regarding 32 IT companies in Hinjewadi
“हिंजवडी मधील ३२ आयटी कंपन्या गुजरातला जाणार”; रोहित पवारांचा गौप्यस्फोट, गेल्या दहा वर्षात एक ही…!
Political parties, election campaign. giant hoarding, Mumbai
फलकबाजी… टोलेबाजी; मुंबईत महाकाय फलकांद्वारे राजकीय पक्षांची श्रेयवादासाठी चढाओढ

हेही वाचा >>> ‘नवीन पनवेल उड्डाणपुलावरील खड्डे बुजवा अन्यथा आंदोलन’; भाजपाचा सिडको मंडळाला इशारा

नवी मुंबई पालिकेने डिसेंबर २०१९ मध्ये प्रारूप विकास आराखडा तयार करून तो फेब्रुवारी २०२० मध्ये सर्वसाधारण सभेत मंजूर करून शासनाकडे पाठविला होता. विकास आराखडा ही एक गोपनीय बाब असताना पालिकेने हा आराखडा सिडको प्रशासनाला दाखविला होता. या विकास आराखड्यात पालिकेने सिडकोच्या अनेक भूखंडावर आरक्षण टाकल्याने सिडकोने त्यावर आक्षेप घेतला. त्यामुळे हा प्रारूप विकास आराखडा प्रसिद्ध करण्याची परवानगी देण्यास नगरविकास विभागाला ३२ महिने लागले सिडकोने आक्षेप घेतलेले सुमारे ३५० भूखंडवरील आरक्षण उठवून नगरविकास विभागाच्या परवानगी नंतर पालिकेने १० आंगस्ट रोजी हा आराखडा प्रसिध्द केला आहे. या ३२ महिन्याच्या कालावधीत सिडकोने अनेक भूखंड विकले त्यात सानपाडा भागातील ९ भूखंडाचा समावेश आहे. पालिकेचे आरक्षण असताना हे भूखंड सिडकोने विकले आणि काही विकासकांनी ते विकत घेतले. त्यांनी आरक्षण उठविण्यात यावे म्हणून जनहित याचिका दाखल केल्या त्यांचा निकाल नुकताच लागला असून सिडको आपल्या मालकीच्या जागा विकण्यास मुक्त आहे, असा निकाल मुंबई उच्च न्यायालयाने दिला. तोच धागा पकडून सिडकोने पालिकेला सूचना दिली आहे की सिडको च्या भूखंडावर आरक्षण टाकणे ही बाब पालिकेच्या अधिकाराच्या बाहेरची असून न्यायालयाच्या निर्णयाची बे अदबी करणारी आहे. तेव्हा पालिकेने प्रसिद्ध केलेला हा प्रारूप विकास आराखडा तात्काळ मागे घेण्यात यावा आणि सिडको च्या भूखंडावर टाकण्यात आलेले आरक्षण रद्द करून तो नंतर प्रसिद्ध करण्यात यावा असे पत्र सिडको च्या नियोजन विभागाने पाठविले आहे. आपली हरकत या हरकती व सूचनांचा अभ्यास करणाऱ्या नियोजन समिती समोर ठेवण्यात येईल आम्ही प्रसिद्ध केलेला विकास आराखडा हा कायद्या नुसार योग्य आहे असे पालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी कळविले आहे.