अखेर नवी मुंबई उप प्रादेशिक परिवहन नवीन कार्यालयाची प्रतीक्षा संपली आहे. ऑगस्टमध्ये नवीन इमारतीतून कामकाज सुरू करण्यात येईल. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे, अशी माहिती आरटीओने दिली आहे.

नेरुळ येथील नवी मुंबई वाशी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचे नवीन इमारतीचे काम जानेवारी- फेब्रुवारी दरम्यान पूर्ण झाले होते. पंरतु ओसी न मिळाल्याने स्थलांतर रखडले होते. मात्र आता ओसी परवानगी मिळाली असून येत्या ऑगस्टमध्येच आरटीओ नवीन कार्यालयातून सुरू होणार आहे. नवी मुंबई शहराकरिता सन २००४ मध्ये नवी मुंबई उप प्रादेशिक कार्यालय सुरु करण्यात आले आहे. मात्र तेव्हा पासून हे कार्यालय वाशीतील एपीएमसी बाजारात भाडेतत्त्वावर सुरू होते. आरटीओला आता स्वतः ची इमारत उपलब्ध होणार असून नेरूळ येथे बांधून तयार असून आता ओसी ही मिळाली आहे, त्यामुळे लवकरच येथून कारभार चालणार आहे. प्रादेशिक कार्यालयाला स्वतःची जागा असावी म्हणून सिडको कडून नेरूळ सेक्टर १३ मध्ये भूखंड घेण्यात आला. मात्र सदर भूखंड ताब्यात घेण्यात सार्वजनिक बांधकाम विभागाकडून विलंब झाला होता. अखेर सन २०१९मध्ये या उप प्रादेशिक कार्यालयाच्या इमारतीचे भूमिपूजन झाले. परंतु त्यांनतर करोना आणि टाळेबंदीने या इमारतीच्या बांधकामाला खो बसला होता. अखेर आरटीओचे कामकाज आता नव्या इमारतीतुन सुरू होणार आहे.

Image of Manmohan Singh's sister
Manmohan Singh Death : मनमोहन सिंग यांच्या बहिणीची व्यथा, आजारपणामुळे घेता येणार नाही भावाच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
Information that 183 buses are closed every day in the state of Maharashtra
एसटी बसमध्ये वारंवार बिघाड… रोज १८३ बसच्या प्रवाश्यांना अडचण…
Special local trains on New Year Local trains will run at night on Central and Western Railways
नवीन वर्षाच्या स्वागतासाठी विशेष लोकल; मध्य, पश्चिम रेल्वेवरून रात्री धावणार लोकल
Maharashtra Public Holiday 2025 List in Marathi
Maharashtra Holiday List 2025 : सरकारी कर्मचाऱ्यांची सुट्ट्यांची यादी जाहीर! २४ सार्वजनिक सुट्ट्यांसह मिळेल ‘ही’ एक्स्ट्रा सुट्टी
inspection of TMT drivers List of instructions for drivers thane news
टीएमटी चालकांची सकाळ संध्याकाळ तपासणी;  चालकांसाठी सुचनांची यादी
Pune railway station, Pune railway station waiting time,
पुणे : रेल्वे प्रवाशांचा स्थानकावरील प्रतिक्षाकाळ कमी होणार, आराखडा अंतिम टप्प्यात
Important update regarding municipal elections in Maharashtra state
राज्यातील महापालिका निवडणुकीबाबत महत्वाची अपडेट, बावनकुळे म्हणाले…

हेही वाचा… दोन साखळी चोरांना अटक; एक मोक्का प्रकरणातील सराईत आरोपी; १० साखळी चोरी गुन्ह्यांची उकल 

रस्ता सुरक्षा आणि हिरकणी कक्षाची नव्याने सुरू

सध्या आरटीओचे कार्यलय छोट्या जागेत सुरू आहे. मात्र आता नेरुळ येथील नवीन इमारत सुसज्ज अशी ४ मजली आहे. या मध्ये सर्व सुविधा उपलब्ध असणार आहेत. या नवीन कार्यलायत स्वतंत्र रस्ता सुरक्षा कक्ष आणि महिला कर्मचाऱ्यांकरिता हिरकणी कक्ष सुरू करण्यात येणार आहे. वाहतुक परवाना साठी हॉल सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. सर्व अधिकाऱ्यांसाठी वेगळी केबिन उपलब्ध असणार आहेत. नागरिकांसाठी बसण्याची, पाण्याची सुविधा असणार आहे. रस्ता सुरक्षा महत्व पटवून देण्यासाठी आरटीओ इमारतीत एलईडी टिव्हीच्या माध्यमातून जनजागृती केली जाणार आहे.

हेही वाचा… कळंबोलीतील सिडको घरांना दोन वर्षातच गळती

अखेर आरटीओची नवीन कार्यलयाची प्रतीक्षा संपली असून येत्या ऑगस्टमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन करण्याचे नियोजन आहे. हेमांगिनी पाटील, उप प्रादेशिक अधिकारी, वाशी आरटीओ

Story img Loader