नवी मुंबई : नवी मुंबई शहराला फ्लेमिंगो सिटी असे संबोधले जाते. येथील डीपीएस तलाव तसेच एनआरआय कॉप्लेक्स पाठीमागील पाणथळ परिसर तसेच नेरुळ सीवूड्स येथील टी एस चाणक्य तलाव येथे मोठ्या प्रमाणात फ्लेमिंगोंचे आगमन होते. यंदा या परदेशी पाहुण्यांचे आगमन लांबणीवर पडले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

गेल्या वर्षी नोव्हेंबर २०२३ मध्येच फ्लेमिंगोंचे आगमन झाले होते. परंतू यंदा डिसेंबरचा दुसरा आठवडा उलटला तरी अद्याप नवी मुंबई परिसरात फ्लेमिंगो आगमन झालेले नाही. फ्लेमिंगोंचे आगमन झाल्याचे व्हिडिओ वायरल झाल्याने फ्लेमिंगोंबाबतची उत्सुकता वाढली.

हेही वाचा…सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे काम अपूर्णच, ६० कोटी रुपयांचे देयक महापालिकेने रोखले

नवी मुंबईतील डीपीएस तलाव तसेच नेरुळ एनआरआय तलाव तसेच टी एस चाणक्य तलाव हे फ्लेमिंगोंचे महत्वाचे अधिवास आहेत. दररोज टी. एस चाणक्य तलाव व नेरुळ एनआरआय तलाव येथे लाखो फ्लेमिंगोंचे आगमन या हंगामात होते. नवी मुंबई महापालिका क्षेत्रात असलेल्या पाणथळ क्षेत्रात फ्लेमिंगोना भरपूर खाद्या मिळत असल्याने तेथे त्यांचा वावर मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतो.

हेही वाचा…उरणच्या बाजारात वालाच्या शेंगा, वीकेंडला रुचकर पोपटीचे बेत

गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये फ्लेमिंगोंचे आगमन नवी मुंबई परिसरात पाहायला मिळाले होते. नाव्हेंबर ते अगदी मे अखेरपर्यंत शहरात फ्लेमिंगोंचे दर्शन होत होते. यंदा मात्र जवळजवळ फ्लेमिंगोंचे आगमन १ महिना लांबणीवर पडले आहे. परंतु फ्लेमिंगोंचे आगमन उशीरा झाल्यास त्यांचा येथील रहिवासही उशीरापर्यंत राहतो. त्यामुळे नेरुळ एनआरआय परिसरात फक्त बोट्यावर मोजण्या इतपत फ्लेमिंगो पाहायला मिळत असल्याची माहिती स्थानिक नागरिक व पक्षप्रेमींनी दिली आहे.

उरणमध्येही पक्षी नाहीत

उरणच्या जेएनपीटी बंदर परिसर पाणजे, फुंडे, जासई, करळ आदी भागांतील पाणथळींवर दरवर्षी हजारोंच्या संख्येने पक्षी येतात. या पक्ष्यांचे निरीक्षण करण्यासाठी शेकडो पक्षिप्रेमी या भागात येतात. पक्षी येथे येण्याचे मुख्य कारण म्हणजे येथील खाडीत मिळणारे या पक्ष्यांचे अन्न आहे. अनेक वर्षांपासून या परिसरात हे पक्षी हजारो किलोमीटरचा प्रवास करून येत आहेत.

गेल्या वर्षी नोव्हेंबर २०२३ मध्येच फ्लेमिंगोंचे आगमन झाले होते. तसेच या फ्लेमिंगोंचा रहिवास मे २०२४ अखेरपर्यंत होता. परंतु कच्छ येथेच फ्लेमिंगोंचे आगमन उशिरा झाल्यामुळे नवी मुंबईतील त्यांचे आगनमही उशीरा होत आहे. तुरळक फ्लेमिंगो दिसू लागले आहेत.

हेही वाचा…निवडणुकीनंतर कामांना गती, नागरी सुविधा कामांच्या निविदांसाठी नवी मुंबई महापालिकेची तांत्रिक समिती

लवकरच मोठ्या प्रमाणात फ्लेमिंगोचे दर्शन होईल. कझाकिस्तानमधील फ्लेमिंगोंचे व्हिडीओ नवी मुंबईतील असल्याची चुकीची माहिती पसरवली जात आहे, नवी मुंबईतील ‘सेव्ह एन्व्हायर्न्मेंट’चे सुनील अग्रवाल यांनी दिली.

वायरल व्हिडिओची चर्चा….

कझाकिस्तान येथील फ्लेमिंगोंचा व्हिडिओ वायरल झाल्यामुळे नवी मुंबईत फ्लेमिंगोंचे आगमन झाल्याची मोठी चर्चा सुरु झाली होती. परंतु नागरिकांनी वाययरल व्हिडिओबाबत खातरजमा करावी असे आवाहन नवी मुंबईतील पर्यावरणप्रेमींनी केले आहे.

उरण आणि नवी मुंबईमध्ये येणारे पक्षी हे या वर्षी तब्बल दीड महिना झाला तरी आलेले नाहीत. ते सैबेरिया या देशातून येत असले तरी यातील हजारो पक्षी हे गुजरातमधील कच्छ प्रांतात वास्तव्यास आहेत. त्या परिसरातील पाणथळींवर पाणीसाठा उपलब्ध असावा. त्यामुळे त्यांचे आगमन लांबले असावे. बी. एन. कुमार, ज्येष्ठ पर्यावरणवादी

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Navi mumbai city is called the flamingo city this year arrival of flamingo bired delayed sud 02