नवी मुंबई आयुक्तपदाचा कार्यभार नुकताच घेतला आहे. सर्व नवीन आहोत मात्र आता टीम तयार करण्यात आली असून वाहतुकीला शिस्त लावणार आहोत. असे प्रतिपादन करीत आपले मनसुबे नवी मुंबई पोलीस आयुक्त यांनी व्यक्त केले आहेत. आजपासून रस्ता सुरक्षा सप्ताहाला सुरवात झाली. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून व्हाईस ओव्हर कलाकार मेघना एरंडे याही उपस्थित होत्या.

हेही वाचा- नवी मुंबईत डान्सबार नव्हे ऑर्केस्ट्रा बार चालवा – पोलीस आयुक्तांचे आदेश

नवी मुंबईत अत्यंत बेशिस्त वाहतूक असल्याचे उघड सत्य आहे. मात्र आता याला शिस्त लागणार असल्याचा विश्वास आयुक्त मिलिंद भांबरे यांनी व्यक्त केला. आज वाशी येथील सिडको सभागृहात रस्ता सुरक्षा सप्ताहाला सुरवात झाली त्यानिमित्त आयोजित कार्यक्रमाला संबोधित करताना आयुक्तांनी सौम्य भाषेत दिलेला कडक इशारा आशादायी असल्याची चर्चा पोलीस वर्तुळात होत आहे. आम्ही आमची टीम तयार होत आहे. येथील वाहतूक समस्या सोडवण्यासाठी कटिबद्ध आहोत . नागरिकांचे जो पर्यंत सहकार्य मिळत नाही तो पर्यंत वाहतूक समस्या सुटणार नाहीत. नवी मुंबईत सुंदर व्यवस्था आहे मात्र तरीही अन्य शहरांची ये जा करणारी वाहतूक प्रचंड आहे एपीएमसी एमआयडीसी जे एन पी टी बाहेर गावी जाणारी प्रवासी वाहनांचा त्यात समावेश आहे.प्रत्येक भागातील आमचे अधिकारी नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करणार आहेत या साठी अन्य प्राधिकरण जसे सिडको मनपा एमआयडीसीचीही मदत घेतली जाणार आहे.

हेही वाचा- नवी मुंबई : संगणकीय प्रणालीत शिधापत्रिका बंद दाखवत असल्याने लाभार्थी धान्यापासून वंचित

मुंबई ट्रान्स लेन आणि आंतरराष्ट्रीय विमानतळ झाल्यावर वाहतूक प्रचंड वाढणार असून समस्याही वाढणार यावर एकाच उपाय वाहतूक शिस्त. सुरक्षित वाहतूक हेच ध्येय असणार रस्ता सुरक्षा हे निमित्त आहे. मार्च अखेर मोठ्या प्रमाणात सीसीटीव्ही लागणार आहे . त्या माध्यमातून वाहतूक नियम मोडणार्यावर नियंत्रण ठेवणार. या कार्यक्रमाला शालेय पालकांना पाल्यांनी सांगितले तर जास्त परिणाम होतो. त्यामुळे त्यांनाच नियमांचे गांभीर्य समजावण्याचा प्रयत्न करीत आहोत.

हेही वाचा- नवी मुंबई : शहरात स्वच्छतेचे तीनतेरा, शेवटी मनपाने बसवले स्वच्छता कर्मचारी, वाचा काय आहे प्रकार

आम्ही आमची टीम तयार होत आहे येथील वाहतूक समस्या सोडवण्यासाठी कटिबद्ध आहोत . नागरिकांचा जॉबपर्यंत सहकार्यबमिळत नाहीत तो पर्यंत वाहतूक समस्या सुटणार नाहीत. नवी मुंबईत सुंदर व्यवस्था आहे मात्र तरीही अन्य शहरांची ये जा करणारी वाहतूक प्रचंड आहे एपीएमसी एमआयडीसी जे एन पी टी बाहेगवी जाणारी प्रवासी वाहनांचा त्यात समावेश आहे. प्रत्येक भागातील आमचे अधिकारी नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करणार आहेत या साठी अन्य प्राधिकरण जसे सिडको मनपा एमआयडीसी चीही मदत घेतली जाणार

मुंबई ट्रान्स लेन आणि आंतरराष्ट्रीय विमानतळ झाल्यावर वाहतूक प्रचंड वाढणार असून समस्याही वाढणार यावर एकाच उपाय वाहतूक शिस्त.
सुरक्षित वाहतूक हेच ध्येय असणार रस्ता सुरक्षा हे निमित्त आहे. ब्रेथ अनालायझर , सिग्नल आदीतून मार्च अखेर मोठ्या प्रमाणात सीसीटीव्ही लागणार आहे . त्या माध्यमातून वाहतूक नियम मोडणार्यावर नियंत्रण ठेवणार. अत्यावश्यक सेवेतील वाहनांना प्राधान्य देणे आवश्यक आहे.

पालकांना पाल्यांनी सांगितले तर जास्त परिणाम होतो. त्यामुळे त्यांनाच नियमांचे गांभीर्य समजावण्याचा प्रयत्न करीत आहोत. या वेळी अभिनेत्री आणि व्हाईस ओव्हर कलाकार मेघना एरंडे यांनी कार्टून मधील लोकप्रिय कॅरेक्टरच्या आवाजात वाहतुकीच्या नियमांचा माहिती दिली. मनोरंजना सोबत या माहितीने सर्वांची मने जिंकली.

या कार्यक्रमात वाहतूक पोलीस आयुक्त तिरुपती काकडे यांनी माहिती देताना सांगितले की सप्ताह निमित्त दोन हजार हेल्मेटचे वाटप होणार असून त्याला लहान मुलांची ५०० हेल्मेट आहेत. शून्य अपघात आणि त्यामुळे शून्य अपघाती मृत्यू हेच ध्येय असणार आहे. यावेळी सर्व विभागाचे पोलीस उपायुक्त , सहाय्यक आयुक्त, तसेच सर्व वाहतूक पोलीस बिटचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उपस्थित होते. बेशिस्त रिक्षा चालकांच्या मुळे वाहतूक विस्कळीत होणे, वाहतूक कोंडी होणे, छोटे मोठे अपघात ही नित्याचीच बाब आहे. त्यामुळे रिक्षा चालकांची जनजागृती विशेष करण्यात येणार आहे. जेणेकरून वाहतूक सुरळीत होईल. अशी माहिती आयुक्त भांबरे यांनी दिली.