नवी मुंबई: काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेच्या वर्षपूर्ती निमित्त नवी मुंबई काँग्रेसने परिवर्तन सभेचे वाशीतील विष्णुदास भावे नाट्यगृहात आयोजन केले होते. यावेळी सर्वच क्षेत्रात सरकार अपयशी ठरल्याचा आरोप करण्यात आला.
टोलच्या पद्धतीने सुविधा देखील पाहिजे टोल च्या बाबत प्रवाशांच्या भावनांचा विचार करून सरकारने निर्णय घ्यावा. तसेच सद्याचे सरकार लॉली पॉप दाखवण्याचे काम करत आहे, ज्या समाजाला गरज आहे. आरक्षणाची त्यांना आरक्षण दिलं पाहिजे, आणि त्यांना समोर आणले पाहिजे. ओबीसी समाजाचा कोटा कमी न होता मराठा समजला आरक्षण दिलं पाहिजे ही काँग्रेसची भूमिका असल्याची प्रतिक्रिया काँग्रेस नेते नसीम खान यांनी दिली.
हेही वाचा… विना परवानगी गौतमी पाटीलचा कार्यक्रम ठेवणे महागात पडले; पनवेलमधील आयोजकांवर गुन्हा दाखल
तर देशात राज्यात भाजप विरोधी जनमत असून जेव्हा जेव्हा निवडणुका होतील तेव्हा काँग्रेस निवडून येईल कारण लोकांना परिवर्तन हवे आहे आणि ते परिवर्तन होणार असल्याचा विश्वास आमदार विश्वजित कदम यांनी व्यक्त केला. यावेळी नवी मुंबई काँग्रेस अध्यक्ष अनिल कौशिक, माजी उपमहापौर रमाकांत म्हात्रे, आयोजक महाराष्ट्र प्रदेश युवक उपाध्यक्ष अनिकेत म्हात्रे यांच्या सह राज्यातील अनेक भागातील युवक अध्यक्ष उपस्थित होते.