नवी मुंबई : नवी मुंबई शहरात १० दिवसांच्या बाप्पांना निरोप देण्यात येत असून शहरात २७५ सार्वजनिक गणेश मंडळांचा व हजारो घरगुती गणरायांचा विसर्जन सोहळा दुपारी ४ वाजल्यापासून सुरु झाला. परंतु ४.३० वाजल्यापासूनच शहरात जोरदार पावसाने सुरवात केली. त्यामुळे विसर्जन मिवणुकीदरम्यान भक्तांना अनेक अडचणी आल्या. परंतु भक्तांचा जोश कायम होता. आज अनंत चतुर्थीच्या दिवशी ढोल ताशांच्या गजरात गणपती विसर्जन सोहळा पार पडत असून भर पावसात विसर्जन मिरवणुकीत तल्लीन होऊन भक्त नाचताना पाहायला मिळाले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
पालिकेच्यावतीने वाशी चौकात मूर्तीवर पुष्पवृष्टी करण्यात आली. पालिका व पोलीस प्रशासनाने विसर्जन सोहळ्यासाठी जय्यत तयारी केली होती. दुसरीकडे या विसर्जन सोहळ्यावर पावसाने भर टाकली. या सोहळ्यासाठी शहरातील अनेक ठिकाणची वाहतूक वळवण्यात आली असल्याचे पाहायला मिळाले. तर नवी मुंबई महपालिकेकडून हा सोहळा शांततेत पार पाडण्यासाठी नैसर्गिक तलावावर सीसीटीव्ही लावण्यात आले आहेत. पर्यावरणशील गणेशोत्सव साजरा करण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिकेने शहरातील आठही विभाग कार्यालय क्षेत्रात नागरिकांच्या सोयीच्या दृष्टीने १३४ इतक्या मोठ्या प्रमाणावर श्रीमुर्ती विसर्जनासाठी कृत्रिम विसर्जन तलावांची निर्मिती केलेली आहे. आज कृत्रिम तलावामध्ये विसर्जनास प्रतिसाद दिला.याशिवाय नैसर्गिक २२ विसर्जन स्थळांवरही विसर्जनाच्या दृष्टीने सर्व व्यवस्था सज्ज होती.
हेही वाचा : अशोक सराफ यांच्या कारकिर्दीला गणपती विसर्जन रथाद्वारे सलाम
दोन वर्षापासून कडक निर्बंधाच्या वातावरणात गणेशोत्सव साजरा करण्यात आला असून दोन वर्षानंतर प्रथमच निर्बंधमुक्त वातावरणात गणेशोत्सव विसर्जन सोहळा साजरा करण्यात येत असल्याने भक्तांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळत आहे. पालिकेने २२ मुख्य विसर्जन स्थळांवर सुव्यवस्थित रितीने विसर्जन संपन्न व्हावे याकरिता तराफ्यांची तसेच मोठ्या मुर्तींकरिता ट्रॉली व क्रेनची व्यवस्था केली आहे.तसेच सुरक्षेच्या दृष्टीने विसर्जन स्थळांच्या काठांवर आवश्यक त्या ठिकाणी बांबूचे बॅरेकेटींग करण्यात आलेले असून ७००पेक्षा अधिक स्वयंसेवक व लाईफगार्ड्स आणि अग्निशमन जवान तैनात करण्यात आले आहेत.
प्रत्येक ठिकाणी पुरेशा विद्युत व्यवस्थेसह जनरेटरची पर्यायी व्यवस्था करण्यात आलेली आहे. तसेच कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने सीसीटीव्हीची यंत्रणा बसविण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे विसर्जनस्थळांवर विसर्जनासाठी येणा-या नागरिकांकरीता पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली असून त्याठिकाणी सुविधा मंचही उभारण्यात आले आहेत. या मंचांवर श्रीगणेश भक्तांचे स्वागत करण्यासाठी व त्यांच्याकरिता करावयाच्या सूचनांसाठी ध्वनीक्षेपक यंत्रणा कार्यरतआहेत. नैसर्गिक व कृत्रिम अशा एकूण १५६ विसर्जनस्थळांवर चोख व्यवस्था पाहायला मिळाली. गणेश विसर्जनासाठी गणेश भक्तांचा जोश कायम असून शांततेत विसर्जन सोहळा सुरु असल्याची माहिती विसर्जन स्थळी कार्यरत असलेल्या पालिकेच्या रमेश कदम व देवेंद्र ब्रम्हे यांनी दिली.तर कृत्रिम तलावाच्या ठिकाणी कार्यरत असलेल्या सुधीर गावीत यांनी कृत्रिम तलावाच्या ठिकाणीही नागरिकांचा विसर्जनाला चांगला प्रतिसाद असल्याची माहिती दिली.
भर पावसात विसर्जन…
सायं ७.३० वाजेपर्यंतचा शहरातील पाऊस
बेलापूर – १९.८
नेरुळ – १४ ७
वाशी – २२
कोपरखैरणे – २३.२०
ऐरोली – २५.३०
दिघा – २७.००