नवी मुंबई : नवी मुंबई शहरापेक्षा यंदा मोरबे धरण परिसरात अधिक पाऊस झाला असून मोरबे धरण ९३ टक्के भरले आहे. तर यंदाच्या पावसाळ्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत अधिक पाऊस झाल्याने धरणाची पाणीपातळी झपाट्याने वाढली आहे. त्यामुळे यंदाही धरण १०० टक्के भरण्याची आशा नवी मुंबईकरांना आहे.

पावसाळ्यापूर्वी मोरबे धरणात कमी पाणीसाठा शिल्लक असल्याने पालिकेला ऐन उन्हाळ्यात विभागवार पाणीकपात करावी लागली होती. परंतु मागील काही दिवसांत झालेल्या दमदार पावसामुळे पाणीकपात रद्द करण्यात आली आहे.

Sri Lanka polls Ruling NPP secures two thirds majority
श्रीलंकेच्या संसदेत एनपीपीला बहुमत ; २२५ पैकी १५९ जागांवर विजय
21 November 2024 Rashi Bhavishya
२१ नोव्हेंबर पंचांग: वर्षातील शेवटचा गुरुपुष्यामृत योग कोणत्या…
Maharashtra rain updates
Maharashtra Rain News: दक्षिण महाराष्ट्राला बिगर मोसमी पावसाचा फटका, आणखी दोन दिवस पावसाचा जोर
manipur violence 10 militants killed in encounter with crpf
अन्वयार्थ : अशांत मणिपूर, अस्वस्थ नागालँड
Sindhudurg rain
सिंधुदुर्ग जिल्ह्यात अवकाळी पाऊसाची हजेरी, बागायतदार चिंतेत
India Meteorological Department has warned a rain alert for 15 districts of Maharashtra state
‘या’ १५ जिल्ह्यांना १५ नोव्हेंबरला सतर्कतेचा इशारा !
onion crisis in maharashtra loksatta analysis how long shortage of onion remain in india
विश्लेषण : कांद्याचा तुटवडा का आणि किती दिवस?
rupee falls for fourth consecutive session
रुपयाचे ८-१० टक्क्यांपर्यंत अवमूल्यनाचा अंदाज; सलग चौथ्या सत्रात घसरण; रिझर्व्ह बँकेच्या हस्तक्षेपाने मोठे नुकसान टळले

हे ही वाचा… उरण तालुक्यात हवा गुणवत्ता निर्देशांक १५० वर

काही दिवस पावसाने उघडीप दिली असली तर सोमवारपासून पुन्हा एकदा पावसाला सुरुवात झाली असल्याने लवकरात लवकर भरावे अशी आशा नागरिक बाळगून आहेत. यावर्षी सलग काही दिवस पाऊस झाला व जवळजवळ ६५० ते ७०० मि.मी. पाऊस झाला तर धरण १०० टक्के भरण्याची आशा आहे. १५ जूनपर्यंत मोरबे धरण परिसरात फक्त ७८.६० मि.मी एवढ्याच पावसाची नोंद झाली होती. त्यामुळे मोरबे धरणामध्ये फक्त २६ टक्के इतकाच कमी जलसाठा शिल्लक होता. त्यामुळे पालिका क्षेत्रामध्ये पाणीपुरवठा करताना संध्याकाळच्या पाणी पुरवठ्यात पालिकेने वाढीव कपात करण्यात आली होती.

मोरबे धरण क्षेत्रामध्ये मंगळवार २० ऑगस्टपर्यंत एकूण ३००५ मिमी इतका पाऊस झाला आहे. यंदा गेल्या वर्षीच्या तुलनेत आजमितीला अधिक पाऊस होऊनही धरणात जलसाठा कमी आहे. पुढील काही दिवस चांगला पाऊस होण्याची शक्यता आहे.

हे ही वाचा… बेकायदा पार्किंगचा विळखा, पामबीच मार्गावर सतरा प्लाझा परिसरात वाहतूक कोंडी

नवी मुंबई महापालिकेला पाणीपुरवठा करणाऱ्या मोरबे धरणात यंदा चांगला पाऊस झाला असून सलग ६०० ते ७०० मिमी पाऊस पडल्यास १०० टक्के धरण भरेल अशी आशा आहे.सध्या मोरबे धरण ९३ टक्क्यांपेक्षा अधिक भरले आहे. – वसंत पडघन, उपअभियंता, मोरबे धरण प्रकल्प