नवी मुंबई: नवी मुंबई गुन्हे शाखेने एका सराईत आरोपीला अटक केले असून त्याच्यावर या पूर्वी दोन वेळा मोक्का कलमान्वये गुन्हा नोंद करण्यात आला होता. त्याच्या अटकेने १० साखळी चोरी गुन्हे उकल झाली आहे. 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

तन्वीर फैरोज हुसेन उर्फ इराणी उर्फ जाफरी आणि अली जावेद इराणी अशी अटक आरोपींची नावे आहेत. यातील तन्वीर याच्या विरोधात दोन वेळा मोक्का कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. ९ जुलैला अजित बळीराम मोकळ हे पत्नी, आई व दोन लहान मुलांसह रिक्षा मधुन प्रवास करीत असताना रिक्षाचे पाठीमागुन येणारी काळ्या रंगाचे मोटार सायकल वर आलेल्या आरोपींनी अजित  यांच्या पत्नीच्या गळ्यातील सोडतीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठन पेंडलसह जबरीने हिसका मारुन चोरुन नेले. याबाबत पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या गुन्ह्याचा तपास करीत असताना घटनास्थळाचे परिसरातील सी.सी.टी.व्ही. कॅमेराची पडताळणी करण्यात आली.

हेही वाचा… कळंबोलीतील सिडको घरांना दोन वर्षातच गळती

दरम्यान पोलीस उपनिरीक्षक अभयसिंह शिंदे यांनी एक गोपनीय माहिती मिळाली. नेमके त्यावेळी ते नाशिक येथे प्रशिक्षण घेत होते. त्यांनी मिळालेली गोपनीय माहिती आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना सांगितली. या माहितीच्या आधारे आरोपीचा ठावठिकाणा शोधणे सुरु केले. आरोपी हे आंबिवली येथे असल्याचे समजताच या ठिकाणी स्थानिक पोलीसांच्या मदतीने कोबींग ऑपरेशन करुन गुन्हयातील आरोपी तन्वीर फैरोज हुसेन उर्फ इराणी उर्फ जाफरी, याला  ताब्यात घेतले. सदर आरोपीकडे केलेल्या तपासात त्याने त्याचा सहकारी आरोपी अली जावेद इराणी याचेसह अनेक साखळी चोरी गुन्हे केल्याचे सांगीतले. या आरोपीलाही पोलिसांनी ताब्यात घेत अटक केली. 

हेही वाचा… मुंबईसह-उपनगरांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; उद्या सर्व शाळा-महाविद्यालयांना सुट्टी जाहीर

आरोपींनी या पूर्वी पनवेल शहर, तळोजा, पनवेल तालुका , कर्नाटक, गुजरात, इत्यादी ठिकाणी अनेक चेन स्नॅचींग, बतावणी अशा प्रकारचे गुन्हे दाखल असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. तसेच अटक आरोपी कडून दोन लाख ८ हजार रुपयांचे ५२ ग्रॅम  सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत.