Navi Mumbai Crime News : नवी मुंबईतील यशश्री शिंदेचं हत्या प्रकरण चर्चेत असताना नवी मुंबईत आणखी एक निर्घृण प्रकार घडला आहे. लग्नाला नकार दिल्याने एका तरुणाने २४ वर्षीय तरुणीवर लोखंडी रॉडने हल्ला केला. इंडियन एक्स्प्रेसने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

गेल्या काही दिवसांपासून महिलांविरोधातील गुन्हे वाढले आहेत. प्रेमप्रकरणातून हत्या होत असल्याने पालकांनी धसका घेतला आहे. तर, सुरक्षा यंत्रणांनी आता कंबर कसली आहे. यशश्री शिंदे या २४ वर्षीय तरुणीची २५ जुलै रोजी निर्घृण (Navi Mumbai Crime News) हत्या करण्यात आली. या हत्येप्रकरणी पोलिसांकडून कसून चौकशी केली जात आहे. या प्रकरणातील संशयित आरोपी दाऊद शेखला अटकही करण्यात आली. या प्रकरणाचा छडा लागत नाही तोवर नवी मुंबईतून आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे.

Shirdi double murder news in marathi
शिर्डीत साई संस्थानच्या दोन कर्मचाऱ्यांची हत्या; एक जखमी ; लुटमारीचा संशय, संशयीत ताब्यात
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Image Of Saif Ali Khan
Saif Ali Khan Attack : “गरज पडली तर पोलीस…”, सैफ अली खानवरील हल्ल्याप्रकरणी गृहराज्यमंत्र्यांनी दिली मोठी अपडेट
Saif Ali Khan Records Statement With Mumbai Police
Saif Ali Khan : सैफ अली खान हल्ला प्रकरणातील आरोपी मोहम्मद शहजादला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी
baba siddique
सिद्दिकी हत्येप्रकरणी पुन्हा चौकशी करा,झिशानला माहीत असलेले सत्य बाहेर येईल; अनिल परब
Mohit Kambo
बाबा सिद्दिकींच्या डायरीत नाव, हत्येच्या काही तास आधी चर्चा; मोहित कंबोज यांचं कथित आरोपांवर स्पष्टीकरण
Tahawwur Hussain Rana extradited to India
२६/११ हल्ल्यापूर्वी १५ दिवस तहव्वूर राणा मुंबईत; हेडलीच्या दोन ईमेलने कटातील सहभागाचा उलगडा
ats arrested accused for forging Aadhaar and pan cards for Bangladeshi infiltrators
बांगलादेशी घुसखोरांना आधारकार्ड, पॅनकार्ड बनवून देणाऱ्यांना एटीएसकडून अटक, तीन बांगलादेशी नागरिकांसह सात जणांना अटक

हेही वाचा >> Yashashree Shinde Murder Case : एकतर्फी नाही, लव्ह ट्रँगलमधून यशश्री शिंदेची हत्या? संशयित आरोपी दाऊद शेखला अटक केल्यानंतर पोलिसांनी दिली माहिती!

मित्रांसमोरच तरुणीवर हल्ला

नवी मुंबईत (Navi Mumbai Crime News) राहणाऱ्या एका ३१ वर्षीय तरुणाने त्याच्या एक्स गर्लफ्रेंडसमोर लग्नाचा प्रस्ताव ठेवला होता. परंतु, तिने लग्नाचा प्रस्ताव धुडकावला. याचा राग मनात ठेवून आरोपी प्रीतम म्हात्रे याने तिच्यावर मित्रांसमोरच समुद्रकिनाऱ्यावर हल्ला केला. जखमी तरुणीला तिच्या मित्रांनी तत्काळ रुग्णालयात दाखल केलं. तिच्या डोक्याला जबर दुखापत झाली असून तिच्यावर उपचार सुरू आहेत.

आरोपीला अटक, चौकशी सुरू

दरम्यान, या प्रकरणातील आरोपी प्रीतम म्हात्रेला अटक करण्यात आली आहे. अधिकाऱ्याने सांगितले की, भारतीय न्याय संहिता अंतर्गत खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित मुलगी एका शाळेत काम करते, असेही पोलिसांनी सांगितले.

उरण प्रकरणातील आरोपीलाही अटक (Navi Mumbai Crime News)

यशश्री शिंदे हत्या प्रकरणातील संशयित आरोपी दाऊद शेखला पोलिसांनी आज सकाळी कर्नाटकातून अटक केली. त्याला नवी मुंबईत आणण्यात येत असून त्याची पुढील चौकशी केली जाणार आहे. एवढंच नव्हे तर हत्येआधीचं सीसीटीव्ही फुटेजही समोर आलं असून हत्येआधी दाऊद शेखने यशश्रीचा पाठलाग केला होता हे यातून स्पष्टपणे दिसतंय. हे सीसीटीव्ही फुटेज २५ जुलै २०२४ या दिवशी दुपारी २ वाजून १४ मिनिट आणि ३५ सेकंदाचं आहे. यानंतर याच दिवशी आरोपी दाऊद शेख यशश्रीनंतर ( Yashshree Shinde ) साधारण आठ मिनिटांनी मिनिटांनी म्हणजेच, २ वाजून २२ मिनिटांनी तिच्या मागे जात आहे. पोलीस तपासात समोर आलेलं हे सीसीटीव्ही फुटेज त्याच दिवशीचं आहे, ज्या दिवशी यशश्रीची हत्या करण्यात आली.

Story img Loader