नवी मुंबई : नवी मुंबई राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीची कार्यकारणी बरखास्त करण्यात आली असून येत्या आठ दिवसात नवीन कार्यकारणी जाहीर करण्यात येणार आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे नव निर्वाचित अध्यक्ष नामदेव भगत यांनी हि घोषणा केली आहे. अशोक गावडे हे शिंदे गटाच्या संपर्कात असल्याची कबुली त्यांनी वरिष्ठांना दिल्यावर नामदेव भगत यांच्या नवी मुंबई राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अध्यक्षपदी वर्णी लागली होती.
हेही वाचा <<< उरण मध्ये विजेच्या कडकडाटस मुसळधार पाऊस ; शहरातील रस्त्यावर पाणीच पाणी
एकेकाळी नवी मुंबईत राष्ट्रवादी कॉंग्रेसचा दबदबा होता मात्र गणेश नाईक यांच्या भाजप प्रवेश नंतर राष्ट्रवादी कॉंग्रेसची पीछेहाट झाली. त्यात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष अशोक गावडे हे एकनाथ शिंदे यांच्याशी संपर्क ठेवून असल्याची कुणकुण लागल्यावर नव्याने राष्ट्रवादी कॉंग्रेस मध्ये प्रवेश केलेले नामदेव भगत यांच्या गळ्यात अध्यक्षपदाची माळ पडली. या घडामोडी नंतर राष्ट्रवादी कॉंग्रेस मध्ये मोठे फेरबदल होणार असल्याचे संकेत देण्यात आले होते. त्याच अनुशंघाने नवी मुंबई राष्ट्रवादी कॉंग्रेसची कार्यकारणी बरखास्त करण्यात आली आहे. नव्या कार्यकारणीत नव्या दमाच्या कार्यकर्त्यांची वर्णी मुख्य पदांवर लागण्च्याचे संकेत देण्यात आले .
हेही वाचा <<< नवी मुंबई : घरा बाहेर जाताय…गाडी कुठे पार्क करणार? घरघर चालते डोक्यात…
नामदेव भगत (जिल्हाध्यक्ष रा.कॉं.पा.) नवी मुंबईत राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीला मानणारा खूप मोठा वर्ग आहे.त्यामुळे पक्षात नवे जुने चेहरे असा संगम करून कार्यकारणी ठरवण्यात येणार आहे. त्यासाठी सध्या संपर्क अभियान सुरु असून सर्वांची मतेऐकून घेतली जात आहेत. माजी मंत्री जितेंद्र आव्हाड, माथाडी कामगार नेते शशिकांत शिंदे यांच्या मार्गदर्शखाली हि प्रक्रिया सुरु आहे.