नवरात्रोत्सवात अनेक भाविकांचे नऊ दिवस उपवास असतात. यादरम्यान बहुतांश भाविकांचा उपवासाच्या दिवशी रसाळ फळे खाण्याकडे जास्त कल असतो. त्यामुळे मागील काही दिवसांपासून फळांची रोडावलेली मागणी आता वाढली आहे. फळांचा बाजारही चांगलाच फुलला आहे़.गणेशोत्सवानतंर थेट नवरात्रोत्सवात फळांना अधिक मागणी असते. घाऊक बाजारात सफरचंद आवक वाढली आहे . परंतु सीताफळ आणि डाळींब अद्याप कमीच दाखल होत आहे. घाऊक बाजारात सफरचंद, डाळींब,मोसंबी, संत्री, सीताफळ यांची मागणी वाढली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा >>> पनवेल : पोयंजे गावात वृद्धाचा खून

एपीएमसीत सफरचंदची शिमला आणि काश्मीरमधील आवक वाढली असून सोमवारी फळ बाजारात ४०२९क्विंटल सफरचंद तर १४९०क्विंटल मोसंबी ,संत्री ६१३ क्विंटल , डाळींब ३७२ क्विंटल तर डाळींब अवघे ४०क्विंटल दाखल झाले आहे. बाजारात सर्वाधिक मागणी ही सफरचंदला आहे. घाऊक मध्ये सफरचंद प्रतिकिलो ७०-१२०रु , सीताफळ ८०-१००रु, डाळींब ८०-१२०रु ,मोसंबी ५०-६०रु तर संत्री ५०-१०० रुपयांवर उपलब्ध आहे.