Online Fruad : सायबर क्राईमच्या अनेक घटना सध्या घडताना दिसत आहेत. क्रेडिट कार्ड, ऑनलाइन शॉपिंग याद्वारे ग्राहकांची फसवणूक केली जाते आहे. नवी मुंबईतल्या एका महिला डॉक्टरची अशाच पद्धतीने फसवणूक करण्यात आली. या महिला डॉक्टरला ३०० रुपयांची लिपस्टिक घेताना १ लाखाला चुना लागला. ३१ वर्षीय महिला डॉक्टरला एका ई कॉमर्स साईटवरुन लिपस्टिक ऑनलाईन ऑर्डर करणं चांगलंच महागात पडलं आहे.

नेमकी कशी झाली फसवणूक?

समोर आलेल्या माहितीनुसार ३१ वर्षीय महिला डॉक्टरने लिपस्टिक ऑर्डर केली. काही दिवसांनी या महिला डॉक्टरला ऑर्डर डिलिव्हरी झाल्याचा संदेश आला. मात्र वस्तू मिळालीच नाही म्हणून तिने कंपनीच्या हेल्पलाईन क्रमांकावर फोन केला. त्या क्रमांकावर या महिला डॉक्टरला सांगण्यात आले की तुम्हाला २ रुपये पाठवावे लागतील. महिलेने पैसे पाठवण्यास नकार दिला. त्यानंतर या महिला डॉक्टरला एक वेब लिंक पाठवण्यास सांगितली. तिला ही लिंक डाउनलोड करण्यास सांगितलं. यानंतर त्यांचा पत्ता आणि बँक तपशीलही भरण्यास सांगितलं. त्यानंतर त्याला BHIM UPI लिंक करण्याचा संदेशही आला. आता तु्म्हाला ऑर्डर पोहचेल असं आश्वासन देण्यात आलं.

stock market fraud loksatta
पुणे : शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने ८७ लाखांची फसवणूक
Daily Horoscope 18 November 2024 in Marathi
१८ नोव्हेंबर पंचांग: संकष्टी चतुर्थी १२ पैकी कोणत्या…
Fraud for 50 thousand rupees by claiming to cure cancer in thane
कर्करोगावरील उपचाराच्या नावाने फसवणूक
life insurance fraud pune marathi news
पुणे: आयुर्विमा पॉलिसीच्या नावाखाली तरुणीची १३ लाखांची फसवणूक
fraud of 19 lakh with youth by cyber thieves
पुणे : सायबर चोरट्यांकडून तरुणाची १९ लाखांची फसवणूक
fraud of One lakh with CME professor in the name of courier
कुरिअरच्या नावाखाली सीएमईच्या प्राध्यापकाची एक लाखांची फसवणूक
Mumbai woman lost rupees 6 lakhs
मुंबई : ऑनलाईन वस्तू विकणे महागात, महिलेला लाखोंचा गंडा
fake doctor defrauded old woman
मुंबई: तोतया डॉक्टरकडून शस्त्रक्रियेच्या नावाखाली वयोवृद्ध महिलेची लाखोंची फसवणूक

यानंतर ९ नोव्हेंबरच्या दिवशी महिला डॉक्टरच्या खात्यातून ९५ हजार आणि नंतर ५ हजार रुपये असे एक लाख रुपये वजा झाले. या प्रकरणी महिला डॉक्टरने पोलिसात तक्रार केली. पोलिसांनी गुन्हा दाखल करुन तपास सुरु केला आहे. ऑनलाइन शॉपिंग करत असताना अशा पद्धतीने गंडा घालून महिला डॉक्टरची फसवणूक केल्याचा प्रकार नवी मुंबईत घडला आहे. News 18 ने या विषयीचं वृत्त दिलं आहे.

ऑनलाइन फ्रॉडपासून वाचायचं असेल तर काय कराल?

सुरक्षित ऑनलाईन पेमेंटचाच पर्याय निवडा

कुठल्याही ठाऊक नसलेल्या लिंकवर जाऊन तुमचे बँक डिटेल्स भरु नका

आपला मोबाइल क्रमांक, आधार क्रमांक यांसारखे महत्त्वाचे क्रमांक अनोळखी ठिकाणी देऊ नका अथवा ऑनलाइन भरु नका.

टू फॅक्टर ऑथेंटिकेशन वापरा

आपल्या सगळ्या अकाऊंट्सचे पासवर्ड स्ट्राँग ठेवा.

मनात थोडासा जरी संशय आला तरीही अनोळखी व्यक्तींकडून सूचना घेणं, वस्तू घेणं यासाठी स्पष्ट नकार द्या.

तुमचे खाते बंद केलं जाईल, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड बंद केलं जाईल असल्या कॉल्सकडे लक्ष देऊ नका. हवंतर बँकेत जाऊन शहानिशा करा.

तुमचे बँक स्टेटमेंट, क्रेडिट आणि डेबिटकार्ड स्टेटमेंट नियमितपणे तपासत राहणं आवश्यक आहे.