नवी मुंबई :शहरात पावसाळ्यात कोणतीही आपत्ती जनक घटना घडू नये याकरता करण्यात येणाऱ्या उपाययोजनांचा एक भाग म्हणून दरवर्षी पालिकेतर्फे पावसाळ्या पूर्वी गटार आणि नाले यांची सफाई केली जाते. यावेळी पालिका आयुक्तांनी २५ मे पर्यंत नालेसफाई पूर्ण करण्याचे आदेश दिले होते. २५ मे ची मुदत संपूनही नालेसफाई अपूर्ण आहे. सध्या पालिका क्षेत्रात ९०% नालेसफाई झाली आहे.
हेही वाचा… उरणमध्ये पावसाच्या तुरळक सरी; उष्म्यात सरीमुळे मातीचा सुगंध दरवळला
शहरात एकूण बेलापूर ते दिघा भागात ७६ लहान, मोठे नैसर्गिक नाले असून यामध्ये एमआयडीसीतील नाल्यांचाही समावेश आहे. आतापर्यंत ९०% काम झाले असून १०% उर्वरित नाले – गटारे अडचणीच्या ठिकाणी आहेत म्हणून राहिले असून ते ही लवकर साफ करण्यात येईल अशी माहिती घनकचरा व्यवस्थापन विभागाने दिली आहे.