नवी मुंबई : मागील दोन वर्षे सातत्याने कचरा वाहतूक व संकलन कामाला मुदतवाढ दिली जात होती; परंतु अखेरीस नव्या वर्षात बहुचर्चित ९०२ कोटी खर्चाच्या कचरा वाहतूक व संकलन कामाची सुरुवात होणार आहे. पालिकेने या नव्या कामाचा कार्यादेश दिला असून प्रथमच ई-कचरा वाहतुकीलाही सुरुवात होणार आहे. पालिकेच्या कचरा वाहतूक ठेक्याची मुदत संपून दोन वर्षे झाल्यानंतरही सातत्याने मुदतवाढ देण्यात येत होती.

महापालिकेने कचरा वाहतूक व संकलनाची निविदा प्रसिद्ध केली होती. त्यानंतर महापालिकेतर्फे प्रथमच कचऱ्याची ई-वाहतूक सुविधाही राबवली जाण्याचे निश्चित करण्यात आले होते; परंतु निविदा प्रक्रियेसाठी अवधी लागल्याने तसेच देशपातळीवर स्वच्छ शहराचा बहुमान असलेल्या शहरात आगामी काळात कचरा संकलनात विविध सुधारणा करत ई-कचरा म्हणजे इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या कचऱ्याची वाहतूक व्यवस्था करण्यात तसेच निविदा निश्चित करण्यासाठीही अवधी लागला होता.

who are intersex people
इंटरसेक्स लोक कोण असतात? समाजात वावरताना त्यांना कोणत्या आव्हानांचा सामना करावा लागतो?
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Palghar MLA Shrinivas Vanga return
Shrinivas Vanga: ‘आधी रडले, ठाकरेंना देव म्हणाले’, घरी परतल्यावर आमदार श्रीनिवास वनगांचे सूर बदलले; म्हणाले, “एकनाथ शिंदे…”
Manoj Jarange News
Manoj Jarange : “मराठे निवडणूक लढवणार नाहीत, कारण एका जातीवर…”; मनोज जरांगेंची मोठी घोषणा
Belapur, Airoli, voters, society Belapur,
१५ हजार मतदारांचे सोसायटीतच मतदान, बेलापूरमध्ये १२ तर ऐरोलीत २ गृहसंकुलांत केंद्रे
Former CM Devendra Fadnavis of the BJP and Sena leader Sanjay Raut Meet
Meeting of Devendra Fadnavis and Sanjay Raut : देवेंद्र फडणवीस आणि संजय राऊत यांच्या ‘फोटो ऑफ द डे’ ची इनसाईड स्टोरी काय?
visa sponsored job in britain
भारतीय तरुणी यूकेमध्ये अडचणीत; “मी फुकटात काम करेन, पण मला नोकरी द्या”, सोशल पोस्ट व्हायरल!
BJP MLA Parag Shah is Maharashtra's Wealthiest Candidate from Ghatkopar East Constituency
‘५०० कोटींवरून पाच वर्षात थेट ३३०० कोटी’, सर्वात श्रीमंत उमेदवाराच्या संपत्तीचा तपशील वाचून डोळे गरगरतील

हेही वाचा – मंदा म्हात्रेंसाठी शिंदे गटाची धावाधाव पुरेशी साथ मिळत नसल्याच्या मुख्यमंत्र्यांकडे तक्रारी

सध्या सतत मुदतवाढ देण्यात येत असलेले काम २४०० रुपये टनाप्रमाणे दिले होते. त्यामुळे या वेळची निविदा १०० कोटीपार होणार हे निश्चितच होते. महापालिकेने शहर स्वच्छतेबरोबरच कचरा वर्गीकरणाकडे अधिक लक्ष केंद्रित केले आहे. नवी मुंबई महापालिकेने कचरा वाहतूक व संकलनासाठी मार्च २०१५ ते मार्च २०२२ पर्यंत शहरातील कचरा वाहतूक व संकलनाच्या ठेकेदाराला काम दिले होते. परंतु संबंधित ठेकेदाराची मुदत संपल्याने पालिकेने याच ठेकेदाराला कामासाठी मुदतवाढ दिली आणि ती सातत्याने वाढवली. आता पालिकेने नुकताच कामाचा कार्यादेश दिला आहे.

कचरा वाहतूक व संकलन निविदा शहरासाठी महत्त्वपूर्ण असून शहराचा देशात स्वच्छतेबाबत नावलौकिक आहे. तो टिकवण्यासाठी पालिका योग्य ती खबरदारी घेत असल्याचे पाहायला मिळत असून त्याची अंमलबजावणीही तितकीच महत्त्वाची ठरणार आहे.

कचरा वर्गीकरण व्याप्ती

नवी मुंबई महापालिकेच्या वतीने नव्या निविदेत कचरा वर्गीकरणाची व्याप्तीही वाढवली आहे. घरगुती घातक कचरा वर्गीकरण तसेच प्लास्टिक, लाकूड, काच, धातू अशा कचऱ्याचे वर्गीकरण करून कचरा संकलन केले जाणार आहे. कचरा वाहतुकीसाठीही प्रथमच छोट्या इलेक्ट्रिक गाड्यांचा वापर करण्यात येणार आहे.

हेही वाचा – शेकाप नेत्यांच्या आदेशानेच निवडणूक रिंगणात, उरण विधानसभा मतदारसंघातील शेकापचे उमेदवार प्रीतम म्हात्रे यांचे स्पष्टीकरण

४० ईवाहनांचाही वापर

सध्या पालिकेत कचरा वाहतुकीसाठी ११० गाड्या वापरल्या जात असून नव्या निविदेत मोठ्या कॉम्पॅक्टरसह एकूण २४६ गाड्या वापरल्या जाणार असून त्यात ४० ई-वाहनांचा वापर करण्यात येणार आहे.

७५० टन एकूण कचरा संकलन

कचरा वाहतूक व संकलनासाठी ठेकेदारास कार्यादेश देण्यात आला असून पुढील काही कालावधीत नव्या निविदेनुसार कामाला सुरुवात करण्यात येत आहे. पालिकेच्या इतिहासात प्रथमच कचरा वाहतूक व संकलनासाठी ई-वाहनांचा वापर केला जाणार आहे. – सुनील पवार, अतिरिक्त आयुक्त, नवी मुंबई महापालिका

Story img Loader