रशिया आणि युक्रेन यांच्यातील संघर्षामुळे डिसेंबर- जानेवारीपासून खाद्यतेलाचा भडका उडाला होता. तेलाची आयात थांबल्याने तेलाची दरवाढ होत होती. परंतु आता सरकारने तेलावरील सीमा-शुल्क रद्द केले आहे . त्यामुळे एपीएमसी बाजारात सातत्याने खाद्यतेलाच्या दरात घसरण होत आहे. मागील दोन महिन्यांत खाद्य तेलाचे दर २० ते २५ टक्क्यांनी उतरले आहेत . एपीएमसी बाजारात दररोज प्रतिकिलोमागे दरात १ ते २ रुपयांची घट होत आहे अशी माहिती तेल व्यापाऱ्यांनी दिली आहे.
हेही वाचा >>>नवी मुंबई : घरा बाहेर जाताय…गाडी कुठे पार्क करणार? घरघर चालते डोक्यात…
देशाला वर्षाकाठी १४०लाख टन आयात होते आणि २५० लाख टन वापर आहे . बाजारेठेत सध्या मलेशिया, अर्जेंटिना, इंडोनेशिया येथून तेलाची आयात होत आहे . तसेच युक्रेन मधून सूर्यफूल तेलाची २०% ते ३०% प्रमाणात आयात सुरू झाली आहे. पाम तेल महिन्याला ८ ते ९ लाख टन असे ६०% आयात होत आहे. देशात ६०% तेलाची आयात होत तर देशातून ४०% तेलाचा पुरवठा होतो. देश परदेशी आयात तेलावर जास्त अवलंबून आहे.
शेंगदाणा तेलाचे दर चढेचशेंगदाणा तेलाचे दर मात्र चढेच आहेत. चायना मध्ये जास्त प्रमाणावर शेंगदाणे आणि शेंगदाणा तेलाची निर्यात होत आहे. महाराष्ट्र आणि गुजरात मधून महिन्याला २ हजार मेट्रिक टन निर्यात होत आहे. त्यामुळे शेंगदाणा तेलाचे दर प्रतिकिलो १८०-१८५रू उपलब्ध असून चढेच राहिले आहेत.
हेही वाचा >>> पनवेल : कामावरून घरी परतत असलेल्या महिलेचा स्थानकाजवळ खून
सरकारने तेलावरील सीमा शुल्क रद्द केले आहे. त्यामुळे दररोज एक ते दोन रुपयांनी तेलाचे दर घसरत आहेत. त्यामुळे व्यापारी जेवढी मागणी असेल तेवढेच तेल खरेदी करीत आहे. – हर्षद देढीया व्यापारी, एपीएमसी
करोना मध्ये उत्पादन कमी झालं होते. आता उत्पादन वाढत आहे. तसेच सरकारने सीमा- शुल्क रद्द केले आहे. आधी १०% ते १५% होती ती रद्द केली आहे. त्यामुळे बाजारात तेलाचे दररोज एक ते दोन रुपयांनी कमी होत आहेत. दिवाळी पर्यंत तेलाचे दर आणखीन कमी होण्याची शक्यता आहे. – तरुण जैन, व्यापारी, एपीएमसी
खाद्य तले प्रकार दर(प्रतिकिलो)
आधी आता
सूर्यफूल १८०रू १४०-१४५रू
सोयाबीन१४०-१४५रू १२३-१२५रू
पाम तेल १३०-१३५रू १००रू
शेंगदाणा तेल १८०-१८५रू १८०-१८५रू