नवी मुंबई: पदाधिकाऱ्यांनी शिंदे यांची साथ धरल्याने उद्धव ठाकरे यांच्या गटाची ताकद शहरात कमी झाली. नवी मुंबईत भाजप नेते गणेश नाईक यांचे कडवे विरोधक समजल्या जाणाऱ्या नेत्यांचा हा मोठा गट एकनाथ शिंदे यांच्या पक्षात आहे. नवी मुंबईतील ऐरोली आणि बेलापूर या दोन्ही विधानसभांच्या जागा भाजपला मिळणार हे स्पष्ट होताच शिवसेना (शिंदे) पक्षात बंडाचे वारे वाहू लागले. उपनेते विजय नाहटा यांनी निवडणुकांची आचारसंहिता जाहीर होण्यापूर्वीच आपण शरद पवार यांच्या पक्षात प्रवेश करणार असल्याचे जाहीर करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नाराजी ओढावून घेतली. पुढे शरद पवार यांनीही नाहटा यांची उमेदवारी पक्की केली नाही. त्यामुळे अखेर त्यांनी बेलापूर विधानसभा मतदारसंघातून अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला. ऐरोलीतून पक्षाचे जिल्हाध्यक्ष विजय चौगुले हेदेखील अपक्ष म्हणून रिंगणात आहेत. या दोन नेत्यांच्या बंडखोरीमुळे संघटनात्मक पातळीवर पक्षात गोंधळ वाढला आहे. बेलापूर विधानसभा मतदारसंघातील पक्षाचे बरेच पदाधिकारी नाहटा यांच्याबरोबर दिसत असल्याने मध्यंतरी ठाण्याचे खासदार नरेश म्हस्के यांनी वाशी येथे बैठक घेऊन महायुतीचा धर्म पाळण्याचे आवाहन केले होते.

वाशी येथील माजी नगरसेवक आणि पक्षाचे संपर्कप्रमुख किशोर पाटकर यांच्याकडे बेलापूर विधानसभा क्षेत्राची जबाबदारी सोपविताना महायुतीच्या उमेदवार मंदा म्हात्रे यांच्यासाठी संघटना सक्रिय करण्याच्या सूचना देण्यात आल्याचे समजते. विजय नाहटा यांच्या बंडखोरीमुळे पक्षात बेलापूर विधानसभा क्षेत्रात गोंधळाची स्थिती आहे. पक्षातील नाराजांची मोट बांधण्याची जबाबदारी जिल्हाप्रमुखांची असताना स्वत: चौगुले हेच अपक्ष म्हणून रिंगणात असल्याने बेलापूर विधानसभा क्षेत्रात शिवसेना (शिंदे) पक्षात कोणाचे आदेश मानायचे असा प्रश्न पडला होता. यावर तोडगा म्हणून निवडणुकांच्या अखेरच्या टप्प्यात किशोर पाटकर यांच्याकडे या भागातील संघटनेची सूत्रे सोपविण्यात आली आहेत.

Devendra fadnavis meet amit shah
नाराज एकनाथ शिंदेंची भाजपकडून मनधरणी, फडणवीस – शहा चर्चेनंतर मंत्रिमंडळ विस्ताराच्या हालचालींना वेग
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक…
shinde shiv sena door open to bjp rebels in navi mumbai
भाजपविरोधी बंडखोरांना शिंदे गटाचे दार खुले? पालिकेत वर्चस्व मिळवण्यासाठी व्यूहरचना
nana patole
पैशाच्या जोरावर लोकशाही विकत घेण्याचा प्रयत्न म्हणजेच ‘ऑपरेशन लोटस’,पटोलेंचा घणाघात
Mahavikas Aghadi
Sanjay Shirsat : ‘मविआ’ला धक्का बसणार? “अनेकजण शिवसेना, भाजपाच्या संपर्कात”, शिंदे गटाच्या नेत्याचा मोठा दावा
BJP, municipal corporation, Mahavikas Aghadi,
विधानसभा निवडणुकीनंतर भाजपची महापालिकेची तयारी, महाविकास आघाडीची पराभूत मानसिकता मात्र कायम
Satish wagh murder case, Pune police,
सतीश वाघ हत्या प्रकरण : आरोपींच्या शोधासाठी पुणे पोलिसांची १६ पथके रवाना
hitendra thakur slams bjp for marathon
मॅरेथॉन घेण्याची ताकद आहे का? राजकारण करणार्‍या भाजपला हितेंद्र ठाकूरांचा सवाल

हेही वाचा : महायुतीची मतपेरणी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रचार सभेत विकास प्रकल्पांवर भाष्य

नवी मुंबईत दोन जिल्हाप्रमुख?

दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निवडणुकांच्या तोंडावर पक्षात मोठा बदल करण्याचा निर्णय घेत बेलापूर विधानसभा मतदारसंघात किशोर पाटकर यांची जिल्हाप्रमुखपदी नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी विजय चौगुले यांच्याकडे संपूर्ण नवी मुंबईचे जिल्हाप्रमुखपद होते. या रचनेत बदल करत नवी मुंबईत यापुढे दोन जिल्हाप्रमुख असतील अशा पद्धतीची रचना करण्यात आली आहे.

Story img Loader