नवी मुंबई: पदाधिकाऱ्यांनी शिंदे यांची साथ धरल्याने उद्धव ठाकरे यांच्या गटाची ताकद शहरात कमी झाली. नवी मुंबईत भाजप नेते गणेश नाईक यांचे कडवे विरोधक समजल्या जाणाऱ्या नेत्यांचा हा मोठा गट एकनाथ शिंदे यांच्या पक्षात आहे. नवी मुंबईतील ऐरोली आणि बेलापूर या दोन्ही विधानसभांच्या जागा भाजपला मिळणार हे स्पष्ट होताच शिवसेना (शिंदे) पक्षात बंडाचे वारे वाहू लागले. उपनेते विजय नाहटा यांनी निवडणुकांची आचारसंहिता जाहीर होण्यापूर्वीच आपण शरद पवार यांच्या पक्षात प्रवेश करणार असल्याचे जाहीर करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नाराजी ओढावून घेतली. पुढे शरद पवार यांनीही नाहटा यांची उमेदवारी पक्की केली नाही. त्यामुळे अखेर त्यांनी बेलापूर विधानसभा मतदारसंघातून अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला. ऐरोलीतून पक्षाचे जिल्हाध्यक्ष विजय चौगुले हेदेखील अपक्ष म्हणून रिंगणात आहेत. या दोन नेत्यांच्या बंडखोरीमुळे संघटनात्मक पातळीवर पक्षात गोंधळ वाढला आहे. बेलापूर विधानसभा मतदारसंघातील पक्षाचे बरेच पदाधिकारी नाहटा यांच्याबरोबर दिसत असल्याने मध्यंतरी ठाण्याचे खासदार नरेश म्हस्के यांनी वाशी येथे बैठक घेऊन महायुतीचा धर्म पाळण्याचे आवाहन केले होते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा