नवी मुंबई : नवी मुंबईतील प्रतिष्ठित बांधकाम व्यावसायिक गुरनाथ चिंचकर यांनी स्वतः च्या डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केल्याची घटना आज (शुक्रवारी ) सकाळी घडली आहे. मुलगा  अमली पदार्थ तस्करी रॅकेट मध्ये अडकल्याने त्यांनी नैराश्यपोटी आत्महत्या केली असल्याचल अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. 

गुरनाथ चिंचकर हे किल्ला गावठाण येथे राहत होते. नेहमी प्रमाणे सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास ते तळमजल्यावर आले. तेथील त्यांच्या कार्यालयात ते बसले व स्वतःच्या बंदूकतून डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली. ही बाब उघडकीस आल्यावर त्यांच्या पुतण्याने एन आर आय पोलिसांनी कळवले. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा आदी सोपास्कार पार पाडले.  

या बाबत अधिक माहिती देताना सहाय्यक पोलीस आयुक्त अजयकुमार लांडगे यांनी सांगितले कि, गुरनाथ चिंचकर यांनी आत्महत्या केल्याचे कळताच पोलीस पथक घटनास्थळी आले. गुरनाथ चिंचकर यांनी नऊ एम एमच्या बंदूकतून गोळी झाडाली आहे. आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी लिहलेली चिठ्ठी आढळून आली आहे. 

त्यांचा मुलगा अमली पदार्थ तस्करी मध्ये अडकला आहे. हेच शल्य त्यांना होते. यातूनच त्यांनी आत्महत्या केली असावी. या प्रकरणी तपास सुरु आहे.