पनवेल ः नवी मुंबई पोलीस दलात कार्यरत असणा-या एका महिला पोलीसाने पतीच्या वेळोवेळीच्या वागणूक आणि टोमण्यांना वैतागूण आत्महत्येचा मार्ग निवडला. मंगळवारी दुपारी ही घटना मॅरेथॉन नेक्सॉन सोसायटीमधील झेनिथ या इमारतीमध्ये घडली. 

मृत महिला पोलीसाचे नाव स्नेहा गोडसे असे आहे. २६ वर्षीय स्नेहा या पती २८ वर्षीय आकाशसोबत मॅरेथॉन सोसायटीत राहत होत्या. आकश हा आयटी कंपनीत कामाला होता. तेथील एका महिलेसोबत त्याचे अनैतिक संबंध असल्याचे स्नेहाला समजल्यावर स्नेहा आकाशला त्या महिलेसोबत बोलू नको, असे सांगत होती. मात्र आकाशला स्नेहा ही अनेक दिवसांपासून अडचण वाटू लागली होती. स्नेहा यांच्या बहिणीने दिलेल्या तक्रारीनूसार स्नेहाला आकाश हा वारंवार टोमणे मारत होता.

हेही वाचा…‘बेस्ट’अधिकाऱ्यांना फौजदारी समन्स ; दिव्यांग चालकांना पर्यायी काम नाकारल्याबद्दल औद्योगिक न्यायालयाकडून समन्स

आकाश हा त्या महिलेसोबत बोलणारच, तू मला नको आहेस, तू मेलीस तर उलट बरे होईल. ती महिला सूशिक्षित आणि मोठ्या पगाराची नोकरी असल्याने स्नेहाची गरज नसल्याचे वारंवार सांगत असल्याने स्नेहा व आकाश यांच्यात भांडणे वाढली होती. मंगळवारी दुपारी साडेबारा वाजता स्नेहा ही गळफास घेऊन आत्महत्या केली. वारंवार याबाबत स्नेहा तीच्या नातेवाईकांना आकाशच्या अनैतिक संबंधाबद्दल आणि आकाशकडून होत असलेल्या वागणूकीबद्दल माहिती दिली होती. पोलीसांकडे अनेकदा तक्रार केली होती. परंतू आकाशवर त्याचा काही परिणाम झाला नाही. आकाश त्याचा अनैतिक संबंधाचा हट्ट सोडत नसल्याने मंगळवारी तीने आत्महत्येचा मार्ग निवडला. पोलीसांनी आकाशविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा मार्ग निवडला आहे.

Story img Loader