नवी मुंबई : नवी मुंबईतील दिघा झोपडपट्टीत यादव नगर भागातील भंगार गोडाऊनला पहाटे अचानक आग लागली. गोडाऊनमध्ये प्लास्टिक आणि ऑइल मोठ्या प्रमाणात असल्याने आगीने काही वेळात रौद्ररूप घेतले. एमआयडीसी आणि नवी मुंबई मनपाच्या अग्निशमनदलाच्या सुमारे दोन तासांच्या प्रयत्नांनंतर आग विझवण्यात यश आले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मंगळवारी (आज) पहाटे ४ वाजता दिघा येथील भंगार गोडाऊनला आग लागली. यात लाखोंचा माल जळून खाक झाला असून या गोडाऊन शेजारी उभी असलेली रिक्षा व टेम्पोही जळून खाक झाला आहे. सुदैवाने यात कोणी जखमी वा जीवितहानी झाली नाही. 

हेही वाचा – VIDEO : विरुद्ध दिशेने वाहन चालवणं नवी मुंबईतील दोन तरुणींच्या जीवावर बेतलं; कारच्या धडकेत मृत्यू

हेही वाचा – PM Modi Maharashtra Visit : पंतप्रधान मोदी १५ जानेवारी रोजी महाराष्ट्र दौऱ्यावर! ‘या’ तीन युद्धनौकांचे करणार लोकार्पण

आगीची माहिती मिळताच आमच्या पथकाने घटनास्थळ गाठून आग विझवण्याचे काम सुरू केले. यावेळी अग्निशमनदलाच्या तीन गाड्यांनी मिळून सुमारे दोन तासांत आग आटोक्यात आणली. मात्र, या आगीत कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. या गोदामात काही तेलाचे टँकर प्लास्टिक, चिंधी मोठ्या प्रमाणात असल्याने आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न करावे लागत होते. आग विझली तरी तासभर कुलिंग केले गेले. हे गोडाऊन ऐन झोपडपट्टीत असल्याने आग अन्यत्र पसरण्याची शक्यता होती. मात्र अग्निशमनदलाच्या सातर्कतेने आग पसरली नाही, अशी माहिती अग्निशमन अधिकारी नितीन कांबळे यांनी दिली. या घटनेने झोपडपट्टीमधील अनधिकृत भंगार दुकाने आणि गोडाऊनचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Navi mumbai fire broke out at a scrap godown in yadav nagar ssb