नवी मुंबई : विदेशातील लाल चुटुक दिसणाऱ्या सफरचंदाची आवक मुंबई कृषी उत्पन्न बाजारात वाढली आहे. प्रति किलो २०० रुपये दराने किरकोळ बाजारात सध्या उपलब्ध आहेत.
सध्या बाजारात विविध फळ हे दाखल होत आहेत. विदेशी सफरचंद बाजारात दाखल झाला असून मोठ्या प्रमाणात खरेदी केली जात आहे. सध्या सफरचंदाचा मौसम सुरु झाला आहे. त्यामुळे आवक होण्याला सुरुवात झाली आहे. विदेशी सफरचंद २०० रुपये किलोने विकले जात आहे. हे सफरचंद मुख्यत्वे टर्की, दक्षिण आफ्रिका, अमेरिकीया आणि न्यूझीलंड देशातून आयात केले जात आहेत. हे सफरचंद भारतीय सफरचंदाच्या तुलनेत काहीसे कमी गोड असले तरी त्यात आंबटपणा आणि कुरकुरीतपणा असल्याने ग्राहकांच्या पसंतीस उतरत आहेत.
हेही वाचा – डोंबिवलीतील फडके रोडवरील पाळणाघरात केंद्र चालकांकडून लहान मुलीचा छळ
सध्या सातशे ते एक हजार पेटी प्रतिदिन येत असून मौसम जास्त दिवस नसल्याने दोन तीन आठवड्यांत आवक घटू शकते, त्यावेळी मात्र दर वाढण्याची शक्यता आहे, अशी माहिती एपीएमसीचे व्यापारी अनु सहानी यांनी दिली.