नवी मुंबईतील वाशी ते बेलापूर पाम बीच असून सदर मार्ग महामार्ग प्रमाणे बनवण्यात आला वाहनावर नियंत्रण नसल्यानेच आता पर्यंत अपघात या रस्त्यावर झाले आहेत. रविवारी झालेला अपघातही याला अपवाद नाही. बेलापूर ते वाशी दरम्यान फॉर्च्युनर गाडी सुसाट वेगाने जात असताना, अक्षर सिग्नलवर वाशी ते बेलापूर मार्गावर जाणाऱ्या रिक्षा चालकाने सिग्नल तोडून उजवीकडे वळण घेतले आणि तो सुसाट वेगाने वाशीकडे जाणाऱ्या फॉर्च्युनर गाडीसमोर तो अचानक आला. त्यामुळे त्याला वाचवण्याचा फॉर्च्युनर चालकाने कसोशीचे प्रयत्न केला मात्र गाडीचा वेग जास्त असल्याने गाडीने रिक्षाला थोडी धडक देत ती दुभाजकावर जाऊन आदळली. यावेळी वेगावर नियंत्रण नसल्याने दुभाजकावर धडकून ही गाडी दोनतीन वेळा रस्त्यावरच उलटली. यावेळी गाडीत मागे बसलेले व्यक्ती आश्चर्यकारकरित्या बाहेर फेकले गेले, तर समोर बसलेल्या दोघांना गंभीर दुखापत झाली त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मात्र सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास त्यातील वाहन चालकाचा उपचाराच्या दरम्यान मृत्यू झाला. तर एक जण गंभीर जखमी असून त्यांच्यासह अन्य दोघांवर उपचार सुरू आहेत. अशी माहिती सागरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र पाटील यांनी दिली आहे. रिक्षा चालकांवर रात्री उशिरा पर्यंत कारवाई झालेली नव्हती.

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Navi mumbai fortunes tragic accident due to rickshaw driver breaking signal death of one msr
Show comments