नवी मुंबई : समाजमाध्यम वापरताना अनावश्यक व संदर्भहीन गोष्टी टाळा, अशा सूचना पोलीस नेहमी जनजगृती करताना देत असतात. मात्र त्याला फारसे गांभीर्याने न घेतल्याने सायबर गुन्ह्यात वाढ होते. असाच एक प्रकार नवी मुंबईत समोर आला असून सहज म्हणून समाज माध्यमातील एक जाहिरात लिंक उघडून पाहिली आणि काही वेळातच कर्ज मिळाल्याचा फोन आला आणि दिड लाखांची फसवणूक झाली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

वाहन चालकाची नोकरी करणारे चांद मोहम्मद यांनी २४ मे रोजी दुपारी सहज म्हणून फेसबुक बघत असताना त्यातील एका जाहिरातीवर क्लिक केले. जाहिरात पाहून फेसबुक बंद केले व आपल्या कामाला लागले. दुसऱ्याच दिवशी त्यांच्या मोबाईलवर एक फोन आला व फोनवरील व्यक्तीने तुम्हाला ५० हजार रुपयांचे कर्ज मंजूर झाले असून त्यासाठी आधारकार्ड, पॅन कार्ड, आणि एक ओळख पटेल असा फोटो पाठवण्यास सांगितले. हि प्रक्रिया चांद यांनी पार पाडली.

हेही वाचा : करंजाडेवासी पाण्यासाठी सिडको भवनावर धडकले

त्यानंतर पुन्हा फोन आले व त्यांनी प्रक्रिया शुल्क म्हणून विविध खात्यावर साडेचार हजार, साडेसहा  हजार,  चार हजार तीनशे, पाच हजार चारशे असे करीत एकूण १ लाख ४७ हजार ४०० रुपये घेतले. मात्र कर्ज काही दिले नाही. शेवटी चांद यांनी या बाबत एनआरआय पोलीस ठाण्यात फसवणूक झाल्याचा अर्ज दाखल केला. याबाबत शहानिशा करून पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा नोंद केला. 