नवी मुंबई: मुंबई पासून सव्वा तास ठाणे – कल्याण पासून अर्धा पाऊण तास तर नवी मुंबईतून १५/२० मिनिटात निसर्ग रम्य ठिकाणी मनसोक्त आनंद घेऊ शकाल असे दोन धबधबे या ठिकाणी आहेत . एक दिवसीय  पावसाळी सहलीचे ठिकाण शोधत असाल तर नवी मुंबईतील गवळी देव डोंगर उत्तम आणि निश्चित पर्याय आहे. घणसोली रबाळे एमआयडीसी मध्ये हा परिसर असून नवी मुंबई ठाण्यातून या ठिकणी येण्यास आता तर रिक्षा, टॅक्सी उपलब्ध आहेत. शिवाय घणसोली स्टेशन वा बेस्टने महापे पर्यंत आलात तर शेअर रिक्षा सुद्धा मिळतात. एक दिवसीय पावसाळी सहलीसाठी एक उत्तम पर्याय हा स्पॉट ठरत आहे. 

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

यंदा उन्हाळा खरंच कडक होता. अगदी हवामान खात्यानेही सांगितले सर्वत्र सुमारे दोन ते तीन डिग्री सेल्सियस तापमान जास्त होते. त्यात पावसाने जून मध्ये ओढ दिली मात्र जुलै महिन्यात पाऊस प्रसन्न झाला आणि भरभरून बरसला. साहजिक सर्वच वयोगटातील लोकांचे पाय निसर्गाच्या कुशीत जाऊन धबधब्याखाली चिंब भिजण्यास वळत आहेत.  नवी मुंबई शहरातच असलेले गवळी देव डोंगर परिसरात त्यामुळेच आता तरुण तरुणीचं नव्हे तर सर्व वयोगटातील मित्रांचे समूह ,कौटुंबिक , कार्यालयातील कर्मचारी अधिकारी यांच्या सहली  निघत आहेत.  मात्र वेळेच्या अभावी अशा सहलीसाठी जवळची ठिकाणे शोधणाऱ्यांसाठी नवी मुंबईतील गवळीदेव डोंगर एक उत्तम पर्याय आहे. नवी मुंबई सारख्या सायबर सिटीत शहराच्या एका बाजूला असणारे हे गवळी देव डोंगर परिसरात तुम्ही गेलात तर वाटणारही नाही कि अवघ्या १० / १५ मिनिटांच्या अंतरावर सिमेंटचे जंगल असलेले नवी मुंबई तर अर्धा तासांच्या अंतरावर ठाणे सारखे शहर आहे. ठाणे कल्याण पासून पाऊण तास नवी मुंबईतून कोठूनही गेलात तर जास्तीत जास्त २० मिनिटे आणि मुंबई पासून सुमारे एक सव्वा तासात हे निसर्ग रम्य ठिकाण असल्याने येथे प्रचंड गर्दी होत आहे. 

हेही वाचा : खारघरमध्ये कोयताधारी दरोडेखोरांची टोळी सक्रिय

या ठिकाणी फार मोठी कठीण चढण नसल्याने जेष्ठ नागरिक सुद्धा थांबून थांबून जाऊ शकतात. ठराविक अंतरावर बसण्यासाठी बाकडेही ठेवण्यात आली आहेत. डोंगरावर खाण्याचे पदार्थ मिळत नसले तरी डोंगर चढण सुरु करताना समोरच मोठ्या प्रमाणात स्टाँल वजा अनेक हॉटेल्स झाली आहेत. त्यामुळे स्नॅक्स सारखे पदार्थ गरम गरम घेऊन जाऊ शकतात. हा परिसर एमएडीसी भागात असला तरी जंगल असल्याने वन खात्याच्या अखत्यारीत येतो. नवी मुंबई मनपा आणि वन खात्यात समन्वय अभावी निधी असूनही हवा तसा विकास झालेला नाही. अर्थात यामुळे अस्सल निसर्ग अनुभव मात्र नक्की तुम्ही उपभोगू शकता. 

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Navi mumbai gavli dev waterfall attracts tourists in monsoon season css